शेतकरी आंदोलनात फूट ते कोरोनाच्या नव्या गाईडलान्स; देशविदेशातील बातम्या एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

देशात कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनातून दोन संघटनांनी माघार घेतली आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी संघटनांनी हा निर्णय घेतला आहे.

देशात कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनातून दोन संघटनांनी माघार घेतली आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. तर कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध आता आणखी शिथिल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने याबाबत नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. भाजप खासदार सुजय विखे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. तांडव वेबसिरीजच्या कलाकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये आता फूट पडली असून ऑल इंडिया किसान समन्वय समितीचे नेते व्हीएम सिंह यांच्या गटाने माघार घेतली आहे. यावेळी व्हीएम सिंह यांनी राकेश टिकैत यांच्यावर काही आरोप केले आहेत. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आता लॉकडाऊनमधील आणखी काही निर्बंध शिथिल केले आहेत. याबाबतचे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. वाचा सविस्तर

नगर : काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. याची माहिती खासदार विखे पाटील यांनी दिली असून ते म्हणाले की,... वाचा सविस्तर

मुंबई : दिल्लीत लाल किल्ल्यावर शीखांचा झेंडा फडकावणाऱ्यांमध्ये दीप सिद्धुचा समावेश होता. त्याचे सनी देओलसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता सनी देओलने यावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर

Budget 2021 : कोरोनाच्या संकटानंतर देशाच्या आगामी अर्थसंकल्पात सरकार कोणते दिलासादायक निर्णय घेणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशाचा अर्थसंकल्प लीक झाला होता? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोस्को कायद्यानुसार लैगिक अत्याचार होण्यासाठी शरीराचा शरीराला स्पर्श व्हायला हवा असा निकाल नागपूर उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून बलात्काराची व्याख्या बदलणारा निर्णय फेटाळून लावला आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावेळी पंजाबी गायक आणि अभिनेता दीप सिद्धू याने हिंसाचारावेळी जमावाचे नेतृ्त्व केलं आणि तरुणांना भडकावलं असा आरोप केला जात आहे. या दीप सिद्धूचे भाजपशी कनेक्शन असल्याचंही सांगण्यात येत आहे.  कोण आहे दीप सिद्धू? वाचा सविस्तर

नवी दिल्ली : भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीचा भडका उडाला असून 90 रुपयांच्या वर किंमत पोहोचली आहे. तर डिझेलही 80 रुपयांपेक्षा जास्त दराने विकले जात आहे. क्रूड ऑइलची किंमत कमी असतानाही या किंमती का वाढतायत? वाचा सविस्तर

मुंबई  : तांडव वेबसिरीज वादात अडकल्यानंतर त्यातील कलाकारांनी संरक्षण मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून त्यांना न्यायालयाने फटकारले आहे. न्यायालयाने म्हटलं की,... वाचा सविस्तर

कोलकाता : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता कोलकात्यातील अपोलो रुग्णालयाने त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest news farmers protest budget 2021 delhi corona new guidelines taandav deep siddhu