
राज्यसह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात येण्यासाठी सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यात राज्यपालांच्या विमान प्रवासाला परवानगी नाकारल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केली. दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत राहुल गांधी यांनी कृषी कायद्यावरून मोदी सरकारला धारेवर धरलं. यावेळी राहुल गांधी यांनी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भारत आणि चीन सीमेवर सैन्य मागे घेण्याची तयारी करत असताना गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाबद्दल रशियन वृत्तसंस्थेनं मोठा खुलासा केला आहे.
महाराष्ट्रात येताना नवी गाईडलाईन, कोरोना टेस्टविषयी सूचना; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात येण्यासाठी सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. वाचा सविस्तर
राज्य सरकारने संविधान, कायद्याचा सन्मान राखला आहे. राज्यपालांचे वय पाहता, त्यांनी कोरोनाच्या संकटात राजभवनातच रहावे. ते राजभवनातच जास्त सुरक्षित आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला. वाचा सविस्तर
राहुल गांधींसह विरोधी पक्षांच्या खासदारांनी मौन बाळगलं तेव्हाही सत्ताधारी पक्षातील खासदारांकडून गोंधळ सुरुच होता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आवाज करणाऱ्या खासदारांना शांत राहण्यास सांगत होते. वाचा सविस्तर
खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेऊन मराठा आरक्षण प्रश्नावर चर्चा केली. वाचा सविस्तर
रशियाचा तास या वृत्तसंस्थेने एक मोठा खुलासा केला आहे. १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीदरम्यान ४५ चीनी सैनिक, तर भारताचे २० जवान शहीद झाले होते, असे म्हटले आहे. वाचा सविस्तर
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांना या पेन्शनचा फायदा घेणं आणखी सोपं आहे. कारण त्यांच्यासाठी ही सेवा मोफत असल्यासारखं आहे. वाचा सविस्तर
सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांची तुलना केली. यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांकडून काहीतरी शिकावं असाही सल्ला दिला. वाचा सविस्तर
अभिनेत्री करिना कपूर, करिश्मा कपूर आणि रणबीर कपूर यांचा चुलत भाऊ अरमान जैनला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले आहेत. वाचा सविस्तर
जागतिक दबावासमोर झुकला सौदी अरेबिया; 1001 दिवसांनंतर महिला कार्यकर्ती हथलौलची सुटका.. वाचा सविस्तर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार राज्यात हम करे सो कायदा असं वागत असल्याचं म्हटलं आहे. वाचा सविस्तर
विजयच्या फॅनसाठी आनंदाची बातमी; 'लायगर'ची तारीख ठरली, विजयच्या बरोबर करण जोहरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. हा चित्रपट 5 भाषांमध्ये रिलिज होईल. वाचा सविस्तर