दिल्लीत बॉम्बस्फोट तर, राज्यात लॉकडाऊनची मर्यादा वाढली; दहा बातम्या एका क्लिकवर

Aaj Divasbharat
Aaj Divasbharat

मुंबईकरांसाठी आजची सर्वांत महत्त्वाची बातमी म्हणजे, मुंबईतल्या लोकल ट्रेन सर्व सामान्यांसाठी सुरू होणार आहेत. महाराष्ट्रात लॉकाडऊनची नियमावली आता आणखी काही दिवस तशीच राहणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणखी बळकट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीत इस्रायलच्या दुतावासाजवळ एक छोटा स्फोट झालाय तर, अक्षयकुमार बहुदा पहिल्यांदाच ट्रोल झालाय. या दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा आम्ही येथे देत आहोत.

मुंबई  :  कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र आता येत्या १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सविस्तर वाचा

मुंबई : केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केरळात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना ऍक्टिव्ह केसेस आहेत असं कालच नमूद केलेलं. सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 1 ते 9 मार्च दरम्यान अयोध्येचा दौरा करणार आहेत. आज मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. सविस्तर वाचा

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना उपोषणापासून परावृत्त करण्यात भाजपला यश आले आहे. केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलास चौधरी, माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मनधरणी केली. सविस्तर वाचा

Delhi Explosion reported at Aurangzeb Road : राजधानी दिल्ली येथील औरंगजेब रोडवरील इस्त्रायलच्या दूतवास कार्यालयाजवळ बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेनेने (एनसीसी) प्रजासत्ताकदिनाच्या संचलनातील प्रतिष्ठेच्या प्रधानमंत्री बॅनरचे उपविजेतेपद पटकाविले आहे. पुण्याची कशीष मेथवानी ‘एनसीसी’च्या एअर फोर्स विंगची सर्वोत्तम कॅडेट (बेस्ट कॅडेट) ठरली आहे. सविस्तर वाचा

इंदूर : मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये देवी अहिल्यादेवी होळकर एअरपोर्टवर गेल्या काही दिवसांपूर्वी एका महिलेने जोरदार गोंधळ घातला. मिळालेल्या माहितीनुसार, तिथे एक महिला हलकल्लोळ माजवत मेन गेटपर्यंत पोहोचली. सविस्तर वाचा

मुंबई : अक्षय जसा त्याच्या अभिनयासाठी प्रसिध्द आहे तसा तो त्याच्या सामाजिक उपक्रमासाठीही ओळखला जातो. त्याने वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर चित्रपटही बनवले आहे. सविस्तर वाचा

PAK vs SA : 14 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर पोहचलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात रडत खडत झालीय. पहिल्या कसोटी सामन्यात यजमान पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 7 विकेट्सनी पराभूत करत कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. सविस्तर वाचा

Syed Mushtaq Ali Trophy Semifinal 1 : दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील तमिळनाडू संघाने सलग दुस्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारलीय. सविस्तर वाचा

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com