राष्ट्रवादीच्या नेत्याला भाजपची मोठी ऑफर तर, 100च्या नोटा होणार इतिहास जमा?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

राज्यातील ठळक घडामोडी, देश-विदेशसह, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

सीरम इन्स्टिट्यूटमधल्या कालच्या आगीच्या घटनेनंतर आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरमला भेट दिली. तर, मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांना भाजपने ऑफर दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर, राजस्थानात एका महिलेचा कोरोना रिपोर्ट गेल्या 5 महिन्यांपासून पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळं डॉक्टरांपुढेही मोठे प्रश्न चिन्ह आहे. यासह आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट आणि 100च्या नोटांसंदर्भातील महत्त्वाची बातमी.

Serum Institute Fire - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा; वाचा काय म्हणाले
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी आज शुक्रवारी भेट देऊन आढावा घेतला. - सविस्तर वाचा

स्वदेशी कोव्हॅक्सिनने पास केली महत्त्वाची 'परीक्षा'; घाबरण्याचं कारण नाही
भारतात कोरोनाविरोधात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन अशा दोन लसी दिल्या जात आहेत. - सविस्तर वाचा

जुन्या 100 रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद? वाचा आरबीआयने काय म्हटलंय
सध्या चलनात असलेल्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या सर्व नोट मार्च किंवा एप्रिलपर्यंत बाजारातून काढून घेण्याचा विचार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Reserve Bank of India (RBI) करत आहे. - सविस्तर वाचा

धक्कादायक! पाच महिन्यांपासून कोरोना पाठ सोडेना; 31 वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह
राजस्थानमध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. भरतपूरच्या अपना घर आश्रमात राहणाऱ्या एक महिला गेल्या 5 महिन्यांपासून कोरोनाशी लढत आहे. - सविस्तर वाचा

केंद्रीय कृषीमंत्री शेतकऱ्यांवर भडकले; 11 वी बैठकही तोडग्याशिवाय
कृषी कायद्यावरून शेतकरी आणि सरकारमधील 11 वी बैठकसुद्धा निष्फळ ठरली. या बैठकीत काहीच तोडगा न निघाल्यानं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर शेतकऱ्यांवर रागावले. - सविस्तर वाचा

अपघातानंतर उचलल्या रस्त्यावरच्या काचा; पुण्यातील महिला पोलिसाची होतेय चर्चा
सोशल मीडियावर पुण्यातील एका महिला वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रस्त्यावर पडलेल्या काचांचे तुकडे संबंधित महिला वाहतूक पोलिस स्वच्छ करताना दिसते. - सविस्तर वाचा

मुंबईकरांना दिलासा! नव्या वर्षात सक्रिय रुग्णांच्या संख्येत 17 टक्के घट
कोरोनामुळे त्रस्त मुंबईकर जणू काही आता रिकव्हरी मोडवर आहेत. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णांचा बरे होण्याचा दर ही वाढला आहे. - सविस्तर वाचा

IPL Mini auction 2021 : चेन्नईत पार पडणार मिनी लिलाव; तारीख ठरलीये कन्फर्मेशन बाकी
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021 ) च्या 14 व्या हंगामापूर्वी; खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. फ्रेंचायझी संघाने खेळाडूंची रिटेन आणि रिलीज यादी जाहीर केल्यानंतर काही खेळाड़ूंच्या अदलाबदलीची प्रक्रियाही सुरु आहे. - सविस्तर वाचा

"स्लेजिंगला खेळाचा भाग मानतो, पण तो भारताविरुद्ध सज्जनासारखा वागला"
ऑस्ट्रेलिया मैदानातील स्लेजिंगच्या प्रकारावर आळा घालण्यासाठी
आयसीसीने काही कठोर नियम केले आहेत. या नियमाला विरोध करुन स्लेजिंगचे समर्थन करणाऱ्या ऑस्ट्रेलियन गड्याने भारतीय संघाविरुद्ध स्लेजिंग केले नाही. - सविस्तर वाचा

Syed Mushtaq Ali Trophy 2021 : बाद फेरीतील सामन्यांचे वेळापत्रक ठरलं!
'स्पर्धेतील अन्य दोन क्वार्टर फायनलच्या लढती 27 जानेवारीला खेळवण्यात येतील. यात तिसऱ्या क्वार्टर फायनलमधील सामना हरियाणा आणि बडोदा यांच्यात रंगेल. - सविस्तर वाचा

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest news ncp mla shashikant shinde bjp covaxin drugs racket ncb pm modi farm law