esakal | मुंबईला नवे पोलिस आयुक्त ते राष्ट्रवादीवर काँग्रेसची नाराजी; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

aaj divasbharat

राज्यासह देश, विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील आज दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

मुंबईला नवे पोलिस आयुक्त ते राष्ट्रवादीवर काँग्रेसची नाराजी; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राज्यात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर आता मुंबई पोलिस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी आता हेमंत नगराळे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर नगराळे यांनी पत्रकार परिषद घेतली. दुसरीकडे या प्रकरणावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सरकारला धारेवर धरलं. 

पुण्यात कोरोना रुग्णांची आकडा वाढत आहेत. दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शहरात पुर्ण लॉकडाऊन लागू करणार की नाही याबाबत खुलासा केला आहे. वाचा सविस्तर

पुणेकर आता देशातील पाच मोठ्या शहरांपर्यंत विमानाने नॉन स्टॉप प्रवास करु शकणार आहेत. डोमेस्टिक एअरलाईन स्पाईसजेटने पुण्यातून 5 शहरांना विमानाने विना थांबा पोहोचता यावे यासाठी योजना बनवली आहे.  वाचा सविस्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या एका घोषणेमुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार प्रदीप भट्टाचार्य यांनी पवार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना पत्र पाठविले आहे.  वाचा सविस्तर

पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी बुधवारी संध्याकाळी नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर नगराळे यांनी पत्रकारांना एक विनंती केली आणि पत्रकारांच्या साऱ्या अपेक्षित प्रश्नांमधील हवाच काढून घेतली. वाचा सविस्तर

मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून ती हत्याच आहे असा पुनरुच्चार करताना त्यांची हत्या कशी झाली? याच्या कथित कट-कारस्थानाचं संपूर्ण कथन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत केलं.  वाचा सविस्तर

सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर काही महत्त्वाच्या कागदपत्रांना आधार लिंक असणं गरजेचं आहे. यामध्ये पॅनकार्ड, बँक खातं याशिवाय रेशन कार्डचाही समावेश आहे. वाचा सविस्तर

एका प्रचारसभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांना आयुष्यात अनेकवेळा मारहाण करण्यात आली. याआधी सीपीएमचे लोक मारहाण करायचे, आता भाजपचे लोक मला मारहाण करत आहेत.  वाचा सविस्तर

सर्वात मोठा आरोप म्हणजे केंद्राकडून अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले जात असल्याचा. या आरोपांवर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. यातील अनेक प्रश्नांना केंद्र सरकारने असं काही होणार नाही म्हणत खुलासा केला आहे.  वाचा सविस्तर

सोशल मीडियावरील ट्रोलिंगविषयी निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या, "मी ट्रोलिंगचा फार विचार करत नाही. आजकाल सोशल मीडियावर माणसं फार जजमेंटल झाली आहेत. या वयात मी पैशांसाठी काम करत नाहीये, तर एंजॉय करण्यासाठी काम करतेय.  वाचा सविस्तर

अरिन 18 वर्षाचा झाल्याने आता त्याने जबाबदार व्यक्तीसारखे वागणे गरजेचे आहे असा संदेश माधुरीने आरिनच्या वाढदिवसानिमित्त दिला. वाचा सविस्तर

loading image