esakal | कुंभमेळ्याची सांगता करा, पंतप्रधानांचे आवाहन ते अभिनेता विवेक यांचे निधन, ठळक बातम्या क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

कुंभमेळ्याची सांगता करा, पंतप्रधानांचे आवाहन ते अभिनेता विवेक यांचे निधन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशात कोरोनाचा कहर झाला आहे. दररोज रुग्ण संख्या लाखांच्या पटीत वाढत आहे. यातच हरिद्वार येथे कुंभमेळा सुरु आहे. या कुंभमेळ्यातही कोरोनाबाधित सापडण्याची संख्या वाढत आहे. अनेक आखाड्यांच्या साधू-संतांना संसर्ग झाला आहे. निरंजनी आखाड्याने महाकुंभाचा शनिवारी शेवट करण्याचा निर्णय घेतला असून या आखाड्याच्या 17 संतांसह 50 पेक्षा जास्त संतांना कोरोना झाला आहे. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडले आहे. त्यातच हवेतूनही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. देशातील कोरोना महामारीच्या उद्रेकाची स्थिती गंभीर असल्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे. त्याचबरोबर केंद्राने पुरेसे व्हेंटिलेटर पुरवले तरी अनेक राज्यांकडे ते बसवण्याची व्यवस्था नसल्याचाही आरोप केंद्राने केला आहे. देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी दोन लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. लसीकरण सुरु असलं तरी इतर सोयीसुविधांचा तुटवडा आहे. यातच हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कुंभ मेळ्यातही कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. कुंभमेळ्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून अनेक आखाड्यांच्या साधू-संतांना संसर्ग झाला आहे. निरंजनी आखाड्याने महाकुंभाचा शनिवारी शेवट करण्याचा निर्णय घेतला असून या आखाड्याच्या 17 संतांसह 50 पेक्षा जास्त संतांना कोरोना झाला आहे. अजून 200 संतांच्या चाचणीचा अहवाल प्रतिक्षेत आहे. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडले आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजला आहे. दररोज लाखो रुग्णांची भर पडत आहे. संपूर्ण जग यामुळे त्रस्त झाले आहे. जगातील अनेक देशांनी यासाठी वेगवेगळ्या लशी विकसित केल्या आहेत. यातच एक धक्कादायक बाब संशोधनातून समोर आली आहे. हवेतूनही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली - देशातील कोरोना महामारीच्या उद्रेकाची स्थिती गंभीर असल्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे. त्याचबरोबर केंद्राने पुरेसे व्हेंटिलेटर पुरवले तरी अनेक राज्यांकडे ते बसवण्याची व्यवस्था नसल्याचाही आरोप केंद्राने केला आहे. देशात गेल्या 24 तासांत नव्या रुग्णसंख्येने विक्रमी टप्पा गाठला असून सव्वादोन लाखांवर नवे रुग्ण आढळले तर, बळींची संख्याही आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 1300 च्या आसपास झाली आहे. मागील वर्षी देशाला महामारीचा पहिला तडाखा बसल्यापासूनची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. वाचा सविस्तर

चेन्नई - प्रसिद्ध तामिळ अभिनेते विवेक यांचा शनिवारी पहाटे चेन्नईतील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते ५९ वर्षांचे होते. शुक्रवारी सकाळी हृदयविकाराचा झटका येताच विवेक यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. विवेक यांनी गुरुवारीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. त्यामुळे त्यांच्या आजारी पडण्याचा संबंध लशीची जोडण्यात येत होता. वाचा सविस्तर

सातारा - ऐतिहासिकदृष्ट्या 'The Rise of Aten' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराची स्थापना तुनखामूनचे किंग तुत यांनी आमेनहोतेप तिसरा (1391-1353 बी.सी.) यांनी केली होती. आमेनहोतेपचा मुलगा अखेनतेन, तसेच तुत आणि त्यांच्या सहकार्यांनी 'गोल्डन सिटी'ची स्थापना करुन ती सिटी सुरु ठेवली होती. वाचा सविस्तर

सातारा - लॉकडाउनचे निर्बंध जाहीर करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील गोरगरीब जनतेला त्याचा फटका बसू नये यासाठी अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी 3 किलो गहू तर 2 किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर

पिंपरी - कोरोना संसर्गाच्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत असल्याने प्लाझ्माची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढवण्यासाठी महापालिकेकडून दोन हजार रुपये प्रोत्साहनात्मक मदत दिली जाणार आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली. सध्या खासगी रुग्णालयांमधील रुग्णांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपये दराने प्लाझ्मा घ्यावा लागत आहे. त्याऐवजी आता महापालिकेच्या रक्तपेढीतून अशा रुग्णांनाही मोफत प्लाझ्मा पुरवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. वाचा सविस्तर

पुणे - कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील आमदारांना त्यांच्या निधीतून मतदारसंघात प्रत्येकी एक कोटी रुपये खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील आमदारांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी आमदार निधीतून खर्च करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. त्यावर पवार यांनी मतदारसंघात एक कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. वाचा सविस्तर

मुंबई - राज्यात गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यात दोन साधूंची पोलिसांसमोर ठेचून हत्या करण्यात आली. रात्रीच्या वेळी चोर समजून त्यांच्यावर हल्ला चढवण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आज एक वर्ष झालं तरी अद्याप ठाकरे सरकारकडून साधू संतांना न्याय देण्यात आलेला नाही. उलट हत्याऱ्यांना आणि मारेकऱ्यांना वाचवण्याची एक खेळी खेळण्यात आली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला तिलांजली देऊनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत हे आज सिद्ध झाले आहे. वाचा सविस्तर

पचखेडी (जि. नागपूर) - सध्या जगात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्ण आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील शेवटच्या टोकावरील जंगलव्याप्त राजोला गावातही मृत्यूचे तांडव सुरु आहे. गेल्या 15 दिवसांत तब्बल 34 मृत्यू झाल्याने गावात स्मशान शांतता पसरली आहे. हे मृत्यू केवळ कोरोनाने नाही, तर अन्य आजारांनीही झाले आहेत, हे विशेष. वाचा सविस्तर

loading image