सरकार नेमतंय ऑनलाइन स्वयंसेवक ते PM मोदी-राहुल गांधी आज आमनेसामने, ठळक बातम्या एका क्लिकवर

Breakfast Updates
Breakfast Updates

मंगळवारी काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, नॅशनल कॉन्फरंससहित विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लोकशाही मुल्यांना पायदळी तुडवणे तसेच गंगा-जमुना संस्कृतीला तोडण्याचा आरोप विरोधकांनी लावला. लोकसभेची कार्यवाही रात्री 1 वाजेपर्यंत चालली. तर देशाच्या एकतेविरुद्ध, महिला, मुलांशी होणारे गैरवर्तन आणि कायदा व्यवस्था बिघडवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सरकारने खास योजना तयार केली आहे. डकावणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी आता सरकार सायबर स्वंयसेवक नेमणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सीनेटमध्ये दुसऱ्यांदा महाभियोग राबवण्याची प्रक्रिया मंगळवार दुपारपासून सुरु झाली आहे. या बातम्यांसह महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

कासगंज : उत्तर प्रदेशमधील कासगंज जिल्ह्यात मंगळवारी पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता तर पोलिस उप निरिक्षक जखमी अवस्थेत आढळला होता. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : काल मंगळवारी काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, नॅशनल कॉन्फरंससहित विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. वाचा सविस्तर

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सीनेटमध्ये दुसऱ्यांदा महाभियोग राबवण्याची प्रक्रिया मंगळवार दुपारपासून सुरु झाली आहे. वाचा सविस्तर

धुळे : येथील केशरानंद गार्डनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण शाखेचा रात्री आठनंतर मेळावा झाला. त्या वेळी प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे आणि जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीसह गोंधळ उडाला. वाचा सविस्तर

देहराडून : उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ग्लेशियरमुळे आलेला प्रलय सर्व जगाने पाहिला. बचावकार्य टीम घटनास्थळी आपले काम बजावत आहे.  ITBP चे जवान रेस्क्यु अभियानात आघाडीवर आहेत. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : देशाच्या एकतेविरुद्ध, महिला, मुलांशी होणारे गैरवर्तन आणि कायदा व्यवस्था बिघडवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सरकारने खास योजना तयार केली आहे. वाचा सविस्तर

पुणे : पुणेकरांनो, गेल्या पाच दिवसांपासून थंडीचा कडाका सातत्याने वाढत असल्याचे आपण अनुभवत आहोत. यंदाच्या हिवाळ्यात तिसऱ्यांदा ९ अंश सेल्सिअसपेक्षा किमान तापमान कमी नोंदले गेले. वाचा सविस्तर

मुंबई : लसीकरण नोंदीसाठी लाभार्थींनी दिलेला नंबर चुकीचा असल्याचे समोर आले आहे. लाभार्थ्यांना संपर्क करण्यासाठी नोंदणी वेळी दिलेले नंबर चुकीचे, संपर्कात नाही, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर लागणे अशा अडचणी येत आहेत. वाचा सविस्तर

नाशिक : नंदुरबारमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून शिक्षणाला सुरवात झाली. पुढील वर्षी अलिबाग, सिंधुदुर्ग, सातारामधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल. वाचा सविस्तर

नागपूर : घरात बाळ आलं की कुटुंब दिवाळीच साजरी करताना दिसून येते. नागपुरात सहा वर्षांत दर दहा मिनिटांनी अशी दिवाळी साजरी केली जात आहे. वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com