esakal | जाणून घ्या दिवसभरातील टॉप १० न्यूज; पाहा व्हिडीओ
sakal

बोलून बातमी शोधा

pocket update

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या येथे वाचा

जाणून घ्या दिवसभरातील टॉप १० न्यूज; पाहा व्हिडीओ

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेता दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांच्यासंबंधी मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी नितीश कुमार यांना तेजस्वी यादव यांच्यासोबत येण्याची ऑफर दिलीये. नितीश कुमारांनी पुतण्याला मदत करावी, असं ते म्हणालेत. सविस्तर बातमी-

बहारिनचे पंतप्रधान खलिफा बिन सलमान अल खलिफा यांचे बुधवारी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. शेख खलिफा हे जगातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती आहेत. ते अमेरिकेत उपचार घेत होते. सविस्तर बातमी-

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालंय. पण, जेडीयू छोट्या भावाच्या भूमिकेत आलाय. एनडीएकडून नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील याबाबत कोणतेही कन्फ्यूजन नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय. आम्ही आमचे वचन पूर्ण करणार, असं भाजपचे वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी म्हणालेत. सविस्तर बातमी-

मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलाय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं अथक प्रयत्न केले. त्यात आता याच प्रयत्नांचे सकारात्मक निकाल दिसून येतायेत. एकेकाळी कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून आनंदाची बातमी समोर आलीये. धारावीत मंगळवारी केवळ एका रुग्णांची भर पडलीये. सविस्तर बातमी-

जगातील सर्वाधिक शक्तीशाली देश अमेरिकेत कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. अमेरिकेत मागील 24 तासांत कोरोना विषाणूचे दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या आता 10 कोटी 55 लाख 9 हजार 184 इतकी झाली आहे. सविस्तर बातमी-

जागतिक पातळीसोबतच भारतातही सोने आणि चांदीच्या भावात घट झालीये. आज सोने 0.15 टक्क्यांनी उतरून प्रति 10 ग्रॅमला 50 हजार 425 रुपयांपर्यंत आले , तर चांदीच्या प्रतिकिलो दरात 0.35 टक्क्यांनी घट होऊन दर 62 हजार 832 रुपयांपर्यंत आलाय. सविस्तर बातमी-

ज्या हातांनी 'स्कूबी डू'  ही  सुंदर कलाकृती तयार झाली, अशा केन स्पीअर्स यांचे नुकतेच आजारपणामुळे निधन झाले. वयाच्या 82 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेतील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सविस्तर बातमी-