हाथरस प्रकरणी काँग्रेस-भाजप नेत्यांना नोटिस; वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 6 October 2020

दिवसभरातील महत्वाच्या देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआमध्ये (एनडीए) जागा वाटप झाले आहे. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी मोदी सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. पाकिस्तानमध्ये शिक्षा भोगत असलेले भारताचे नागरिक कुलभूषण जाधव यांची केस लढण्यास पाकिस्तानी वकीलांनी नकार दिला आहे. भौतिक शास्त्रासाठी नोबेल पुरस्काराची मंगळवारी घोषणा करण्यात आली.

बिहारमध्ये एनडीएचं जागावाटप ठरलं; जदयू 122 तर भाजप 121 जागांवर लढणार

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआमध्ये (एनडीए) जागा वाटप झाले आहे. 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत जदयूला 122 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये जदयू आपल्या कोट्यातून जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाला 7 जागा देणार आहे. त्यामुळे स्वतः जदयू 115 जागांवर निवडणूक लढणार आहे. सविस्तर बातमी-

रोजगार दूरच, खायला अन्नही मिळणार नाही; कृषी कायद्यावरून राहुल गांधींचा घणाघात

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी मोदी सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. ट्विटरवर सातत्याने ते मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतातच, मात्र आता त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावरच्या लढाईसाठी कंबर कसलेली असल्यांचं दिसून येत आहे. पंजाबमधील पटियाला येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मोदी सरकारवर घणाघाती आरोप लावले आहेत. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे पंजाब राज्याला सर्वात मोठे नुकसान होईल आणि हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांवरील हल्ला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सविस्तर बातमी-

हाथरस पीडितेचा वापरला फोटो; स्वरा भास्करसह काँग्रेस-भाजपच्या नेत्याला महिला आयोगाची नोटीस

महिला आयोगाने अभिनेत्री स्वरा भास्कर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि भाजपाच्या आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय यांना स्वतंत्ररित्या नोटीसा पाठवल्या आहेत तसेच यावर स्पष्टीकरणही मागवले आहे. आयोगाने या पाठवलेल्या नोटीशीत म्हटलंय की, आपल्या सोशल मीडियातील पोस्टमध्ये आणि आंदोलनामध्ये हाथरस येथील पीडितेचा फोटो वापरण्यात आला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, याप्रकारे पीडितेची ओळख जाहिर करणे हा गुन्हा आहे. सविस्तर बातमी-

खवय्यांसाठी खुशखबर! आता स्ट्रिट फूडही मिळणार ऑनलाईन

स्ट्रिट फूड घरबसल्या मिळावं असं अनेकांना वाटतं. कोरोना महामारीच्या काळात तर अनेकांना स्ट्रिट फूड खाण्याची इच्छा झाली असेल, पण सर्व काही बंद असल्याने अनेकांना आपली इच्छा मारावी लागली. मात्र, आता तुम्हाला घरबसल्या स्ट्रिट फूड ऑर्डर करता येणार आहे. सरकारने यासंबंधात एका प्रमुख ऑनलाईन फूड ऑर्डरिंग आणि डिलीव्हरी प्लॅटफॉर्म कंपनीशी करार केला आहे. सविस्तर बातमी-

चीनला लावणार लगाम? भारतासह चार शक्तीशाली देश आले एकत्र
चार मोठे देश एकत्र येऊन चीनला लगाम लावण्याचा प्रयत्न करत आहेत. जपानची राजधानी टोकिओमध्ये मंगळवारी Quad देश भारत-ऑस्ट्रेलिया-अमेरिका-जपानच्या परराष्ट्रमंत्र्याची 'द क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग' (Quad) अंतर्गत बैठक पार पडत आहे. सविस्तर बातमी-

कुलभूषण जाधव यांची केस लढण्यास पाकिस्तानी वकीलांचा नकार

पाकिस्तानमध्ये शिक्षा भोगत असलेले भारताचे नागरिक कुलभूषण जाधव यांची केस लढण्यास पाकिस्तानी वकीलांनी नकार दिला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जाधव यांच्यातर्फे केस लढण्यासाठी काही वकीलांना निवडले होते. पाकिस्तानी सरकारने याआधीच भारतीय वकीलांच्या नेमणुकीला नकार दर्शवला होता. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा कोणता कट रचत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सविस्तर बातमी-

रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एँड्रिया घेज यांना भौतिक शास्त्रातील नोबेल

भौतिक शास्त्रासाठी नोबेल पुरस्काराची मंगळवारी घोषणा करण्यात आली. यंदा हा पुरस्कार अमेरिकेचे रॉजर पेनरोज (Roger Penrose), रेनहार्ड गेंजेल (Reinhard Genzel) आणि एँड्रिया घेज (Andrea Ghez) यांना कृष्ण विवराच्या शोधासाठी संयुक्तरित्या देण्यात आला आहे. सविस्तर बातमी- 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election bjp jdu rahul gandhi donald trump modi nobel prize