कर्करोगग्रस्त पाकिस्तानी महिलेची सुषमांकडे मदतीची याचना

वृत्तसंस्था
रविवार, 9 जुलै 2017

इस्लामाबादमधील भारतीय दुतावासाने फैजाचा वैद्यकीय व्हिसा रद्द केला आहे. दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण असल्यानेच फैजाचा व्हिसा रद्द करण्यात आल्याचे तिचे आईने म्हटले आहे. त्यानंतर फैजाने सुषमा स्वराज यांना ट्विट करत या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

इस्लामाबाद - कर्करोगग्रस्त एका पाकिस्तानी महिलेने उपचारासाठी भारतात येण्यासाठी थेट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची याचना केली आहे.

भारतीय दुतावासाकडून 25 वर्षीय फैजा तन्वीरचा व्हिसा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे तिने आता सुषमा स्वराज यांना ट्विट करत मदतीची मागणी केली आहे. फैजाला तोंडाचा कर्करोग असून, तिला उपचारासाठी गाझियाबादमधील इन्द्रप्रस्थ महाविद्यालय व रुग्णालयात यायचे आहे. यासाठी तिने दहा लाख रुपयेही भरले आहेत. मात्र, व्हिसा न मिळाल्याने ती उपचारासाठी येऊ शकत नाही.

इस्लामाबादमधील भारतीय दुतावासाने फैजाचा वैद्यकीय व्हिसा रद्द केला आहे. दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण असल्यानेच फैजाचा व्हिसा रद्द करण्यात आल्याचे तिचे आईने म्हटले आहे. त्यानंतर फैजाने सुषमा स्वराज यांना ट्विट करत या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. गेल्या महिन्यात एका पाकिस्तानी कुटुंबाने सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितल्यानंतर त्यांना मदत मिळाली होती.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:
संपूर्ण कर्जमाफीसाठी पुन्हा आंदोलनाचा 'एल्गार' !
दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात सीआरपीएफचा जवान जखमी
भंडारदरा धरणात मुंबईतील तरुण बेपत्ता​
धुळे: टँकरद्वारे पिकांना पाणी; पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल​
दिव्यांगाच्या जीवनात शिक्षणाची बहार!​
कॉंग्रेस सरकारमधील शिक्षणमंत्री बरे होते : आदित्य ठाकरे​
कोस्टल रोडचा दुसरा टप्पा रद्द; मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला धक्का​
'इंदू सरकार'वर कॉंग्रेसचा आक्षेप​
'लोक'शाही की 'एक'शाही? (संजय मिस्कीन)​
इस्राईलशी मैत्रीपर्व (श्रीराम पवार)​
#स्पर्धापरीक्षा - हरित भारत अभियान​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancer patient from Pakistan seeks Sushma Swaraj’s help on Twitter for medical visa