esakal | आज दिवसभरात काय घडलं; वाचा देश-विदेशातील महत्वाच्या 7 बातम्या
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine suprim court amit shah bjp who sirum donald trump kamla harris us election 18 august

आज दिवसभरात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.

आज दिवसभरात काय घडलं; वाचा देश-विदेशातील महत्वाच्या 7 बातम्या

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पीएम केअर्स फंडच्या निधीवरून सुरू झालेल्या वादावर आज, सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिलाय. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रकृती अस्वस्थामुळे मध्यरात्री उशीराने दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आहे. देशातील सहा राज्यांमध्ये कोरोनाचा कहर माजवला आहे. भारतात पुढील आठवड्यात कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु केली जाणार आहे. 


पीएम केअर्स फंडासंदर्भात, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

पीएम केअर्स फंडच्या (PM Cares Fund) निधीवरून सुरू झालेल्या वादावर आज, सुप्रीम कोर्टाने Supreme Court महत्त्वाचा निकाल दिलाय. कोर्टाने पीएम केअर्स फंडातील पैसे राष्ट्रीय आपत्ती निवारण फंडात (एनडीआरएफ-NDRF) ट्रान्सफर करण्याचे आदेश देण्यास नकार दिला आहे. या संदर्भात एक जनहीत याचिका दाखल झाली होती. त्यावर सरकारने हा निर्णय दिलाय. पीएम केअर्स फंडात नागरिका स्वेच्छेने निधी देत आहेत, अशी बाजू सरकारच्या वतीनं कोर्टात मांडण्यात आली. सविस्तर बातमी-

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा रुग्णालयात दाखल 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रकृती अस्वस्थामुळे मध्यरात्री उशीराने दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आहे. त्यांना खासगी वार्डमध्ये ठेवण्यात आले असून एम्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मागील 3-4 दिवसांपासून त्यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास जाणवत आहे. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर बातमी-

Corona Updates: देशातील सहा राज्यांमध्ये कोरोनाचा कहर; महाराष्ट्रातील आकडे दिलासादायक!

सध्या कोरोना रुग्णांची जी लाट देशभर पसरत आहे, त्यामध्ये महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्ये आघाडीवर होती. या राज्यांमध्ये दररोज नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण सर्वाधिक असून मृतांचा आकडाही वाढत असल्याचे चित्र समोर आले होते. पण आता उत्तर आणि ईशान्य भारतातील सहा राज्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोरोनाची लागण भारतात मार्च महिन्यात सुरू झाल्यावर इतर भारतातील राज्यांतून स्थलांतरित कामगार मोठ्या प्रमाणात माघारी घरी ( सहा राज्यात) आले होते. सविस्तर बातमी-

आनंदाची बातमी; भारतात पुढील आठवड्यात लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु 

ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका (Oxford-AstraZeneca vaccine) कोरोनावरील लस निर्माण करण्यात आघाडीवर आहे. लस सध्या परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. 2020 च्या शेवटपर्यंत लस लाँच करण्याची तयारी केली जात आहे. एका अहवालानुसार, 2021 सालच्या सुरुवातीला ही लस सार्वजनिकरित्या सर्वांसाठी उपबल्ध असेल. तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण यूके, यूएस, ब्राझील आणि दक्षिण आफ्रीका येथे केले जात आहे. भारतात सीरम इंस्टिट्यूटकडून पुढच्या आठवड्यात परिक्षण सुरु होण्याची दाट शक्यता आहे. सविस्तर बातमी-

WHO म्हणते,'कोरोना व्हॅक्सिनच्या भरोशावर बसू नका, स्वत:ची व्यवस्था बघा'

जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं की, कोरोना व्हायरसवर लशीची वाट बघत बसू नये. देशांमध्ये पसरत असलेल्या कोरोनाविरुद्ध तुमची व्यवस्था सुधारण्याकडे लक्ष द्यायला हवं. व्हॅक्सिनवर अवलंबून राहू नये कारण सुरुवातीला मागणीच्या तुलनेत पुरवठा करता येणं शक्य नाही. सर्वांनी कोरोना विरुद्ध आपला लढा सक्षम केला पाहिजे. केवळ व्हॅक्सिनच्या आशेवर राहून चालणार नाही. सविस्तर बातमी-

भारतानंतर अमेरिकेचा चीनला दणका; 38 बड्या कंपन्यांवर बंदी

अमेरिकेने चीनच्या हुवेई या कंपनीवरील निर्बंध आणखी कडक केले आहेत. दूरसंचार उपकरणे बनविणाऱ्या या कंपनीला अमेरिकी तंत्रज्ञानापासून वंचित ठेवून महत्त्वाचे घटक न मिळू देण्याचा हेतू यामागे आहे. ही कंपनी आमच्यावर पाळत ठेवत असल्याने तिची उपकरणे नकोत, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. इतर कोणता देश ती वापरत असल्यास आम्ही माहिती शेअर करणार नाही, असेही ते म्हणाले. सविस्तर बातमी-

"डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदासाठी अयोग्य उमेदवार"

अधिवेशनाला अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी म्हणजे माजी अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी संबोधित केले. यावेळी मिशेल यांनी आपल्या भाषणातून अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती होण्यास लायक नाहीत, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. सविस्तर बातमी-

 

loading image