esakal | स्वदेशी कोविड-19 लस ते इस्त्रायल-युएई मैत्री; दिवसभरातील देश-विदेशच्या 7 महत्वाच्या बातम्या
sakal

बोलून बातमी शोधा

esakal1.jpg

दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

स्वदेशी कोविड-19 लस ते इस्त्रायल-युएई मैत्री; दिवसभरातील देश-विदेशच्या 7 महत्वाच्या बातम्या

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

भारत बायोटेक या कंपनीची कोरोनावरील लस पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरली आहे. दुसरीकडे अमित शहा यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. इस्त्राईल आणि यूएईमध्ये मैत्री करार झाला आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. 

आनंदाची बातमी; भारताच्या कोरोना लसीचा पहिला टप्पा यशस्वी; कोणतेही दुष्परिणाम नाहीत 

आईसीएमआरकडून बनवली जाणारी कोविड-19 लस (Coronavirus vaccine) पहिल्या मानवी चाचणीच्या टप्प्यात यशस्वी ठरली आहे. चाचणीनंतर चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. भारत बायोटेक आणि जायडस कैडिलाच्या कोरोनावरील लसीवर बारा शहरांमध्ये मानवी चाचणी सुरु आहे.  भारतातील 12 शहरांमधील 375 स्वयंसेवकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. सविस्तर बातमी-

अमित शहा यांची अहवाल निगेटिव्ह 

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस ते निवासस्थानी विलगीकरणात राहणार आहेत. दोन ऑगस्टला शहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. शहा यांनी आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्यांचे आणि मेदांता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. ‘आज माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी आता काही दिवस विलगीकरणार राहणार आहे,’ असे शहा यांनी ट्वीट केले आहे.

RBI केंद्र सरकारला देणार 57 हजार 128 कोटी; प्रस्तावाला मंजुरी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या उत्पन्नाचे साधन काय? सरकारला डिव्हिडंड म्हणून पैसे का देते? असे अनेक प्रश्न असतात. रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत सरकारी बाँड, सोन्यात करण्यात आलेली गुंतवणूक आणि परदेशी बाजारामध्ये फोरेक्स आणि बाँड ट्रेडिंग हे आहेत. रिझर्व्ह बँक आवश्यकता पूर्ण झाल्यानंतर जे काही शिल्लक राहतं ते पैसे सरकारच्या खात्यात पाठवते. रिझर्व्ह बँक यंदा सरकारला 57128 कोटी रुपये डिव्हिडंड म्हणून देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सविस्तर बातमी-


सचिन पायलट म्हणाले,'डॉक्टरांना दुखणं सांगितलं आणि उपचारही केले' बंडखोरीवरून डिवचणाऱ्यांना प्रत्युत्तर

सचिन पायलट यांच्या बंडखोरीवरून राठोड यांनी हल्लाबोल केला. यावर पायलट यांनी प्रत्युत्तर दिलं. पायलट म्हणाले की, डॉक्टरांना दुखणं सांगायचं होतं. ते सांगितलं आणि उपचार करून आज आम्ही सगळे एकत्र आहे. ऐकलं - सांगितलं या गोष्टी सोडून आता जमिनीवर या. बॉर्डरवरून कितीही गोळीबार झाला तरी आम्ही योद्धे आहोत सर्वकाही सुरक्षित ठेवू असंही पायलट म्हणाले. सविस्तर बातमी-

न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण दोषी; शिक्षा होणार?

न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना दोषी ठरविण्यात आले आहे.  सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांनी केलेल्या दोन ट्विटवरून त्यांनी दोषी ठरविण्यात आले आहे. न्यायमूर्ती अरूण मिश्रा, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि  न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. 20 ऑगस्ट रोजी आता त्यांना काय शिक्षा होणार यावर पुढील सुनावणी होणार आहे. सविस्तर बातमी-

5 काय 500 राफेल आणले तरी फरक पडत नाही; पाकिस्तानची पोकळ धमकी

पाकिस्तानच्या निर्मितीदिवशी पाकिस्तानी लष्कराने भारताला पोकळ धमकी दिली आहे. भारत 5 राफेल विमाने खरेदी करु किंवा 500 आम्हाला फरक पडत नाही. आम्ही भारताला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत, असं पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी म्हटलं आहे. सविस्तर बातमी-

इस्त्रायल-युएई मैत्रीमुळे भारताशी पंगा घेणाऱ्या राष्ट्राला दणका बसणार

पश्चिम आशियाई देशातील दोन शक्तीशाली राष्ट्रांमधील इस्त्रायल आणि संयुक्त अरब अमीरात यांच्यातील वर्षानुवर्षे असणारे शत्रूत्व अखेर संपुष्टात आले आहे. इस्त्रायलने पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या पॅलिस्टनी भागावरील हक्क सोडला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्त्रायल आणि युएई यांच्यातील प्रमुख नेत्यांनी द्विपक्षीय संबंध सामान्य करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ही घटना आंतरराष्ट्रीय राजकारणातील ऐतिहासिक घडामोड मानली जात आहे. सविस्तर बातमी-

उप-राष्ट्रपती पदाची उमेदवारी महिलेला मिळाल्याने पुरुषांचा अपमान- डोनाल्ड ट्रम्प 

डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन (Joe Biden) यांनी मंगळवारी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांच्या निवडीवर टीका केली आहे. उपराष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून एका महिलेची निवड झाल्याने पुरुष अपमानित वाटून घेऊ शकतात, असं ते म्हणाले आहेत. सविस्तर बातमी-