ट्रम्प-बायडेन यांच्यात ऐतिहासिक 'डिबेट'; वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 29 September 2020

देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

उत्तर प्रदेशातील हाथरस इथं सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आता या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. बिहारच्या निवडणूकीत अजूनही एनडीए आघाडीच्या जागावाटपांची स्थिती संदिग्ध आहे. भारताने  पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या काश्मिरमधील गिलगित-बाल्टिस्तानमध्ये होणाऱ्या निवडणूकांसंदर्भात हरकत घेतली आहे.

आणखी एका 'निर्भया'ची झुंज अपयशी; सामूहिक बलात्कारानंतर नराधमांनी कापली होती जीभ

उत्तर प्रदेशातील हाथरस इथं सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बलात्कार करणाऱ्या नराधमांनी पीडितेची जीभ कापली होती. याशिवाय जबर मारहाण केली होती. यात तिच्या पाठीचे हाडही मोडले होते. गेल्या आठवड्याभरापासून ती सफदरजंग रुग्णालयात मृत्यूशी लढा देत होती. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला.  सविस्तर बातमी- 

शेतकरी ज्याची पूजा करतात त्यालाच विरोधकांनी पेटवलं - पंतप्रधान मोदी

देशात सुरू असलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधावरही मोदींनी प्रतिक्रिया दिली. विरोध करणाऱ्यांना शेतकरी स्वतंत्र झालेलं पाहवत नाही. शेतकरी ज्याची पूजा करतात त्यालाच आग लावली जात आहे. देशात एमएसपी राहील आणि विरोधक एमएसपीबाबत जो दावा करत आहेत तो खोटा आहे असंही मोदी म्हणाले. सविस्तर बातमी-  

राहुल गांधींची किसान की बात; काँग्रेस कृषी कायद्यांना देणार न्यायालयात आव्हान

केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी विधेयकांना सध्या देशभरातून जोरदार विरोध होत आहे. विरोधी पक्षांसह देशातील अनेक शेतकरी संघटना देखील रस्त्यावर उतरून या कायद्याला असलेला विरोध दर्शवत आहेत. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असणारा काँग्रेस या कायाद्याविरोधात न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहे. या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरच आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. सविस्तर बातमी- 

बिहार निवडणूक : BJP-LJP मध्ये जागावाटपाचा तिढा; चिराग पासवान यांचे नड्डांना पत्र

बिहारच्या निवडणूकीत अजूनही एनडीए आघाडीच्या जागावाटपांची स्थिती संदिग्ध आहे. बिहारमधील लोक जनशक्ती  पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यादरम्यान जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी पत्र लिहल्यानंतर ही बातचित झाली. मिळालेल्या माहितीनुसार, चिराग पासवान यांच्या नेतृत्वातील लोजपाला 42 जागांची अपेक्षा आहे. किंवा मग, 32 जागा, दोन विधानपरिषदेतील जागा आणि उत्तर प्रदेशातून एक राज्यसभा सीट अशी मागणी आहे. सविस्तर बातमी- 

ट्रम्प-बायडेन यांच्यात डिबेट'युद्ध'; कोणत्या मुद्यांवर होणार वाद? का आहे महत्व?

अध्यक्षीय निवडणुकीला 35 दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ऐतिहासिक अशा 'प्रेसिडेंशियल डिबेट'ला सुरुवात होत आहे. ज्यात डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन अनेक मुद्द्यांवरुन आपली मतं व्यक्त करतील आणि ते एकमेकांसोबत वादविवाद करतील. सविस्तर बातमी- 

पाकने अवैध ताबा सोडावा; गिलगित-बाल्टिस्तानमधील निवडणुकांवरून भारत आक्रमक

भारताने  पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या काश्मिरमधील गिलगित-बाल्टिस्तानमध्ये होणाऱ्या निवडणूकांसंदर्भात हरकत घेतली आहे. या निवडणूकांना असलेला आपला विरोध  प्रकट केला आहे. पाकिस्तानने या भागात विधानसभेच्या निवडणूका जाहिर केल्या आहेत. या निवडणूका 15 नोव्हेंबरला होणार आहेत. गिलगित-बाल्टिस्तान हा प्रदेश भारतातील जम्मू काश्मीरच्या केंद्र शासित प्रदेशाचा भाग आहे, ज्यावर पाकिस्तानने अवैध पद्धतीने ताबा घेतला आहे, असं भारताचं म्हणणं आहे. सविस्तर बातमी-

कोरोनाच्या संकटात भर; अमेरिकेतील रुग्णालयांवर मोठा सायबर हल्ला

काही दिवसांपूर्वी अमेरिकेत अनेक मोठ्या व्यक्तींचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर अमेरिकेत आणखी एक मोठा सायबर हल्ला झाला आहे. अमेरिकेतील एका मोठ्या हॉस्पिटलच्या सर्व शाखांची कॉम्प्युटर सिस्टिम हॅक करण्यात आली आहे. साईट हॅक झाल्याने सर्व डॉक्टर आणि नर्संना कामासाठी ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीचा वापर कराला लागला. कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी आरोग्य संस्था दिवसरात्र काम करत आहेत, अशात सायबर हल्ला झाला असल्याने हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना अडचणीँचा सामना कराला लागत आहे. सविस्तर बातमी-

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: up narendra modi farm bill bihar election us election donald trump joe biden