esakal | दिवसभरात आज काय घडलं? वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या
sakal

बोलून बातमी शोधा

esakal

दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

दिवसभरात आज काय घडलं? वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

सीबीआयने कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या 14 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. 2020 सालचा वैद्यकीय नोबेल पुरस्कार Nobel Medicine Prize जाहीर करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान शहीद; 3 जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. आरओपीवर road opening party (ROP) दहशतवाद्यांकडून अंदाधूंद गोळीबार करण्यात आला यात सीआरपीएफच्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर चीन जवान जखमी झाले आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. एएनआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. दक्षिण काश्मीरच्या पेंम्पोरमध्ये हा हल्ला झाला असून लष्करांने परिसरात शोध मोहीम सुरु केली आहे. सविस्तर बातमी-

PM मोदींनी 'चुप रहो भारत, शांत रहो भारत' अशी घोषणा द्यावी, काँग्रेस नेत्याचा टोला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी हाथरस घटनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर सवाल उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी 'सबका साथ सबका विकास सबका विश्वास' ऐवजी 'चुप रहो भारत, शांत रहो भारत' ही घोषणा दिली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. मोदींचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. सविस्तर बातमी-

काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार यांच्या घरावर सीबीआयची धाड, 14 ठिकाणांवर छापे

सीबीआयने कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या 14 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली आहे. शिवकुमार यांचे बंधू खासदार डी के सुरेश यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये 9, दिल्लीत 4 आणि मुंबईतील एका ठिकाणी हे छापे मारण्यात आले आहेत. सीबीआयने याप्रकरणी शिवकुमार यांच्यासह इतरांविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. सविस्तर बातमी-

"पश्‍चिम बंगालमध्ये 115 भाजप कार्यकर्त्यांची हत्या; हीच लोकशाही का?'' 

‘पश्‍चिम बंगालमध्ये आतापावेतो किमान ११५ भाजप कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हीच राज्य सरकारची लोकशाहीची व्याख्या आहे का?’’, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. या राज्याला देशविरोधी कारवाया करणाऱ्या घुसखोरांची धर्मशाळा बनवायचे आहे का, असे विचारतानाच भाजपने, ‘राज्य सरकारच्या या दडपशाहीला राज्यातील जनता लवकरच लोकशाही मार्गानेच उत्तर देईल,’ असेही भाकीत केले आहे. सविस्तर बातमी-

अटल बोगद्यामुळं चीनचा जळफळाट; बोगदा उडवून देण्याची ग्लोबल टाइम्सची भाषा

चीनची सरकारी वृत्त वाहिनी ग्लोबल टाईम्सने भारताला धमकी दिली आहे, भारत आणि चीनमध्ये युद्ध सुरु झाले तर भारताने नुकतेच बनवलेल्या अटल बोगद्याला उद्धवस्त केले जाईल, असं म्हणण्यात आलं आहे. चिनी वृत्तपत्राने एका विशेषज्ञांच्या हवाल्याने आरोप केलाय की, हा भारतीय भाग खूप कमी लोकसंख्येचा आहे आणि या बोगद्याचा उद्देश लष्करासाठी वापरण्याचा आहे. मात्र, भारताला या बोगद्याचा काही वापर करु देणार नाही. सविस्तर बातमी-

नवाज शरीफ यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल!

पाकिस्तानी सैन्याची पोलखोल करणाऱ्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नवाज शरीफ यांच्याविरोधात लाहौरमध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. नवाज शरीफ यांना लंडनमध्ये भडखाऊ भाषण देऊन पाकिस्तानच्या प्रतिष्ठित संस्थांविरोधात कट रचला आहे, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.  सविस्तर बातमी-

'हिपेटाइटिस सी'च्या शोधासाठी तिघांना वैद्यकीय नोबेल पुरस्कार जाहीर

2020 सालचा वैद्यकीय नोबेल पुरस्कार Nobel Medicine Prize जाहीर करण्यात आला आहे. हार्वे जे अल्टर (Harvey Alter), माईकल ह्यूटन (Michael Houghton) आणि चार्ल्स एम राईस (Charles Rice) या तिघांना संयुक्तपणे नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 'हिपेटाइटिस सी व्हायरस'च्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. रक्तामधील हेपेटाइटिस, जगभरात सिरोसिस आणि यकृतच्या कँसरसाठी कारणीभूत ठरतो. याविरोधात लढण्यासाठी या तिघांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. सविस्तर बातमी-