esakal | कला क्षेत्राला दोन मोठे धक्के; वाचा दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या
sakal

बोलून बातमी शोधा

esakal3.jpg

आज दिवसभरात देश-विदेशात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.

कला क्षेत्राला दोन मोठे धक्के; वाचा दिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

आज कला क्षेत्राला दोन मोठे धक्के बसले आहेत. ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि संगितकार पंडित जसराज यांचे वयाच्या 90 व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. दुसरीकडे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे (वय ५०) निधन झाले. चीनने आपला आठमुठेपणा कायम ठेवला असून सैन्य माघारी घेण्यास टाळाटाळ करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.


शाळा, कॉलेज सुरू करा; सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांचे म्हणणे

 देशात शाळा-कॉलेज-विद्यापीठं सुरू करण्या संदर्भात विचार व्हावा, असे संकेत सुप्रीम कोर्टानं (supreme court) आज दिले आहेत. कोर्टात आज NEET आणि JEE Main या परीक्षांबाबत दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान, कोर्टानं शिक्षणाशी संबंधित सर्व गोष्टी सुरू करायला हव्यात, असं मत व्यक्त केलंय. ही वेळं सुरक्षा साधनं घेऊन पुढं जाण्याची आहे, असं मत कोर्टानं व्यक्त केलंय. सविस्तर बातमी-

कला क्षेत्राला आज दोन मोठे धक्के बसले

ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि संगितकार पंडित जसराज यांचे वयाच्या 90 व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. सध्या न्यूजर्सी येथे असलेल्या पंडीत जसराज यांना काल रात्री थोडा त्रास होत होता. त्यांच्या शिष्यांनी रुग्णालयात दाखल करण्या संदर्भात विचारले असता त्यांनी नकार दिला. आज, सकाळी उठल्यानंतर त्यांनी तीन वेळा दीर्घ श्वास घेतला आणि प्राण सोडले अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी सकाळशी बोलताना दिली. डोंबिवली फास्ट, लय भारी, दृश्यम, मदारी अशा एकापेक्षा एक सरस कलाकृती देणारे दिग्दर्शक निशिकांत कामतच यांचे (वय ५०) आज निधन झाले. सविस्तर बातमी-

चीनचा आडमुठेपणा कायम; सैन्य माघारी घेण्यास करतोय टाळाटाळ

लडाख सीमेवर सैन्य माघारीत चीनने चालविलेली टाळाटाळ पाहता पुढील उपाययोजनांबाबत चर्चेसाठी राजकीय नेतृत्व आणि लष्करी नेतृत्वाची लवकरच लडाखमध्ये बैठक होणार असल्याचे समजते. गलवान खोऱ्यामध्ये पॅंगॉग त्सो तलावाचे फिंगर क्षेत्र, देप्सांग पठार तसेच गोगरा या भागामधून चीनने सैन्य माघारी बोलवावे याबाबत लष्करी आणि राजनैतिक पातळीवर वारंवार चर्चा होऊनही चीनी सैन्याची आडमुठी भूमिका राहिली आहे. सविस्तर बातमी- 

चंद्राबाबू नायडू यांचे नरेंद्र मोदी यांना पत्र; केला गंभीर आरोप 

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सरकारकडून विरोधकांचे फोन टॅप केले जात आहेत, असा आरोप आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहले असून उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. टेलिफोन टॅपिंगमुळे नागरिकांचा खासगीपणा धोक्यात आल्याचेही नायडू यांनी म्हटले आहे. सविस्तर बातमी-

निवडणुकांबाबत न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी घेतला मोठा निर्णय

कोरोनाचे पुनरागमन झाल्यामुळे न्यूझीलंडमधील निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय पंतप्रधान जेसिंडा अर्डेर्न यांनी घेतला. 19 सप्टेंबरची निवडणूक चार आठवड्यांनी लांबणीवर टाकण्यात आली. आता 17 ऑक्टोबर ही नवी तारीख ठरली आहे.  गेल्या मंगळवारी ऑकलंडमध्ये एका कुटुंबातील चार जणांना संसर्ग असल्याचे निदान झाले. रविवारअखेर नव्या रुग्णांचा आकडा 49 पर्यंत गेला होता. त्याआधी 102 दिवसांच्या कालावधीत एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नव्हती. सविस्तर बातमी-

चीनच्या नादानं भारताशी पंगा घेणारा शेजारी वटणीवर?

15 ऑगस्ट दिवशी नेपाळच्या पंतप्रधानांनी मोदींशी चर्चा केली.  भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही देशांच्या प्रमुखांनी एकमेकांसोबत फोनवरुन चर्चा केल्याची माहिती दिली होती. ओली सरकारने स्वातंत्र्य दिनासोबतच  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वाच्या निवडीबद्दल भारताचे अभिनंदन केले होते. नेपाळने भारताच्या हद्दीतील हिस्सा आपल्या सरकारी कामकाजाच्या नकाशामध्ये दाखवल्याचा प्रकार समोर आला होता. या मुद्यावरुन दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण झाले. त्यानंतर पहिल्यांदाच मोदी-ओली यांच्यात चर्चा झाली. सविस्तर बातमी-

रशियाच्या कोरोना लशीची पहिली बॅच तयार; चीननेही दिली 'गुड न्यूज'

कोरोना विषाणूवरील लस (Covid-19 vaccine) रशियाने तयार केल्यानंतर आता चीनही त्या दिशेने पुढे जात असल्याचं दिसत आहे. जागतिक स्तरावर या दोन्ही देशांच्या लशींना अजून मंजुरी मिळाली नाही, पण उभय देशांनी लस निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरु केली आहे. रशियाने Sputnik V लशीची पहिली बॅच तयार केली आहे. दुसरीकडे चीनच्या  CanSino Biologics Inc कंपनीच्या Ad5-nCOV लशीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे रशियानंतर आता चीननेही लस निर्मितीला सुरुवात केली आहे. सविस्तर बातमी-

 

loading image