प्रशांत भूषण प्रकरणात काय झालं? वाचा दिवसभरातील महत्वाच्या 7 बातम्या

esakal123.jpg
esakal123.jpg

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 31 लाखांच्यावर पोहोचली आहे. प्रशांत भूषण यांनी केलेल्या अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. दुसरीकडे पुलवामा प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेत ट्रम्प यांच्या एका समर्थकाने हिंदी बोलण्याच्या नादात त्यांची खिल्ली उडवली आहे.


देशात कोरोनाबाधितांची संख्या 31 लाखांवर; सीरमच्या लशीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या आठवड्याभरात रुग्णांची संख्या दरदिवशी 60 ते 70 हजारांनी वाढत आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 31 लाखांच्या वर पोहोचली आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे 31 लाख 6 हजार 349 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 23 लाख 38 हजार 36 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या 7 लाख 10 हजार 771 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 57 हजार 542 इतका झाला आहे. सविस्तर बातमी-

प्रशांत भूषण माफी न मागण्यावर ठाम; सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

प्रशांत भूषण यांनी केलेल्या अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस ए बोबडे आणि सर्वोच्च न्यायालय प्रकरणी केलेल्या टिप्पणीवर ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. सविस्तर बातमी-

प्रवासासाठी आता 'ई-पास' आणि क्वारंटाईन पण नाही...

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. लॉकडाऊनदरम्यान प्रवासासाठी निर्बंध घालण्यात आले होते. पण, विविध राज्ये लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणत आहे. कर्नाटकमध्ये प्रवासासाठी ई-पास आणि क्वारंटाईनची आवश्यकता नाही. सविस्तर बातमी-

पुलवामा प्रकरणी 3500 पानी चार्जशीट; हल्ला 6 फेब्रुवारीला होणार होता पण... 

पुलवामा येथे ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याच्यासह १९ जणांविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. पुलवामा हल्ल्याचा कट रचल्याचा आणि हल्ला घडवून आणल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. सविस्तर बातमी-

ट्रम्प 'उल्लू'सारखे बुद्धिमान; अमेरिकी राजकीय भाष्यकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल

टोमी लाहरेन यांनी भारतीय मतदारांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची स्तुती करताना त्यांचा उल्लेख 'उल्लू' असा केला आहे.  डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात अमेरिका पुन्हा महान बनेल, असं त्या म्हणाल्या. यावेळी त्या हिंदीमध्ये म्हणाल्या की, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प उल्लू सारखे बुद्धिमान आहेत. हिंदीत बोलून भारतीय मतदारांना आकर्षित करणाऱ्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण त्याच्या उलट घडून आलं आहे. सविस्तर बातमी-

ग्रेटा थनबर्गला भारतीय विद्यार्थ्यांची काळजी; जेईई- नीट परीक्षेबद्दल व्यक्त केलं मत 

कोरोनाच्या संकटकाळात संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्‍ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) पुढे ढकल्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांसह अनेक राजकीय नेत्यांनीही या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. स्वीडनची प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनेही याबाबत ट्विट करून विद्यार्थ्यांचे समर्थन केले आहे. सविस्तर बातमी-

कोरोना संसर्गाची दुसऱ्यांदा बाधा शक्य; पुरावा मिळाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा

 एकाच व्यक्तीला कोरोना विषाणूचा दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचा पुरावा मिळाल्याचा दावा हाँगकाँग विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला आहे. एकदा संसर्ग झाल्यावर पुन्हा विषाणूची लागण होते का, या मुद्यावर शास्त्रज्ञांचे दुमत असून अद्यापपर्यंत ठामपणे कोणतीही बाजू मांडता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर हा पुरावा मिळाला आहे. सविस्तर बातमी-


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com