esakal | राजकारणापासून ते कोरोनापर्यंत दिवसभरातील देश-विदेशच्या 7 महत्वाच्या बातम्या
sakal

बोलून बातमी शोधा

sachin pilot pranav mukharji.jpg

राजस्थानमध्ये राजकीय हालचाली पुन्हा वाढताना दिसत आहे. सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. दुसरीकडे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राजकारणापासून ते कोरोनापर्यंत दिवसभरातील देश-विदेशच्या 7 महत्वाच्या बातम्या

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

राजस्थानमध्ये राजकीय हालचाली पुन्हा वाढताना दिसत आहे. सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. दुसरीकडे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. रशियामध्ये 12 जून रोजी पहिल्या कोरोना लसीची नोंदणी होणार आहे. पण या लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने शंका उपस्थिती केली आहे. बैरुत स्फोटानंतर अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. 

राजस्थान : सचिन पायलट यांनी घेतली राहुल गांधींची भेट

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली आहे. पायलट यांचे बंड फसल्याचं दिसत आहे. दुसरीकडे सचिन पायलट पुन्हा पक्षात परतण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सचिन पायलट आणि राहुल गांधी यांची भेट महत्वाची ठरणार आहे. सविस्तर बातमी-

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना कोराना; स्वत: ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यांनी खुद्द ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. आठवड्याभरात संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला विलगीकरण करुन घ्यावे तसेच आपली चाचणी करुन घ्यावी, असा उल्लेख त्यांनी ट्विटमध्ये केलाय. सविस्तर बातमी-

राजस्थानमध्ये 11 पाकिस्तानी शरणार्थींचे आढळले मृतदेह 

राजस्थानातील लोडटा गावात पाकिस्तानातील हिंदू स्थलांतरित कुटुंबातील ११ सदस्य मृतावस्थेत आढळले. सर्वजणांनी विषारी रसायन प्राशन करून आत्महत्या केल्याची प्रथमदर्शनी दिसते. मात्र, त्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण लगेच सांगता येणार नाही, अशी माहिती पोलिस अधीक्षक (ग्रामीण) राहुल बारहाट यांनी दिली.  सविस्तर बातमी-

तरुण पाण्यात बुडत असताना, महिलांनी जे केलं ते ऐकून तुम्हीही कराल त्यांना सलाम

सोशल मीडियावर सध्या तीन महिलांचे कौतुक होत आहे. तामिळनाडूच्या एका गावात राहणाऱ्या तीन शूर महिलांनी 4 बुडणाऱ्या युवकांना वाचवण्यासाठी जे केलंय ते ऐकून तुम्हालाही त्यांना सलाम करावासा वाटेल. चार तरुण बुडत असल्याचं पाहून या तीन महिलांनी त्यांना वाचवण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता आपल्या साड्या काढून पाण्यात फेकल्या. त्यांना दोन तरुणांना वाचवण्यात यश आलं आहे. सविस्तर बातमी-
 

रशियाच्या कोरोना लसीविषयी संशय; WHOची धक्कादायक माहिती

रशियाने येत्या दोन दिवसांत कोरोनावरील लस (First Covid-19 vaccine)जगापुढे आणण्याचा दावा केला आहे. रशियाच्या (Russia Covid19 Vaccine) आरोग्य मंत्रालयाने त्या दाव्याला दुजोरा दिला असून, या लसीची रितसर नोंदणीही करण्यात येणार आहे. पण, रशियाच्या या लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सविस्तर बातमी-

इतर शेजाऱ्यांशी संबंध बिघडत असताना एकाने दिली भारताला साथ

बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए के अब्दुल मोमीन यांनी भारत आणि बांगलादेशमधील संबंधाबाबत भाष्य केलं आहे. उभय देशांमधील संबंध ऐतिहासिक आणि खडकासारखे मजबूत असल्याचं ते म्हणाले आहेत. जगातील कोणतीही शक्ती भारत आणि बांगलादेशमध्ये असणाऱ्या संबंधांना नुकसान पोहोचू शकत नसल्याचं ते म्हणाले. सविस्तर बातमी-

रक्ताळलेले कपडे आणि त्यात गुंडाळलेला चिमुकला जीव; बैरूत स्फोटानंतरचा फोटो प्रचंड व्हायरल 

बैरत- लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतरचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यातच एक फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये एक बाप रक्ताळलेल्या कपड्यात असून त्याने नुकत्याच जन्मलेल्या आपल्या मुलाला हातात घेतल्याचं दिसत आहे. बैरुतमध्ये झालेल्या स्फोटानंतर काही मिनिटातच या मुलाने जन्म घेतला होता. सविस्तर बातमी-