भारत, रशिया आणि अमेरिकेसह जगभरात काय चाललंय; एका क्लिकवर वाचा 7 बातम्या

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

कोरोनावरील लस तयार केल्याच्या रशियाच्या दाव्यावर आता अनेक देशांनी आक्षेप नोंदवला आहे. तसंच कोरोनावर लस तयार करताना घाई करणं धोक्याचं ठरू शकतं असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

नवी दिल्ली - भारतासह जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दरम्यान, कोरोनावरील लस तयार केल्याच्या रशियाच्या (Russia) दाव्यावर आता अनेक देशांनी आक्षेप नोंदवला आहे. तसंच कोरोनावर लस तयार करताना घाई करणं धोक्याचं ठरू शकतं असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात
भारतात अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukharjee) यांच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याआधी मुखर्जी यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. शस्त्रक्रियेनंतर मुखर्जींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली होती. आता ते कोमामध्ये गेल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मुखर्जींच्या प्रकृतीबाबत अफवा पसरत असून त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन कुटुंबियांनी केलं आहे. 

राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना कोरोना, मोदी क्वारंटाइन होणार?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना (Amit Shah) कोरोना झाल्यामुळे ते राम मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमात उपस्थित राहिले नव्हते. आता राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.  महंत नृत्य गोपालदास यांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. ते काल (ता. १२) झालेल्या कृष्ण जन्माष्ठमी सोहळ्यातही सहभागी झाले होते. तसेच ते राम जन्मभूमीपूजन सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि योगी आदित्यनाथ (Ypgi Adityanath) यांच्यासोबत कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित होते. यामुळे आता पंतप्रधान मोदी क्वारंटाइन होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाचा सविस्तर

मोदींनी घडवला इतिहास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता.१३) माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpeyi) यांचा रेकॉर्ड मोडला आहे. वाजपेयी यांच्यानंतर सर्वात जास्त काळ सत्ता गाजवणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून मोदींनी हा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वाचा सविस्तर

राजस्थान - सचिन पायलट यांनी घेतली गेहलोत यांची भेट
राजस्थानात राजकीय संघर्ष सचिन पायलट (Sachin Pilot) आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भेटीने थांबला. त्यानंतर आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचीही सचिन पायलट यांनी गुरुवारी भेट घेतली. काँग्रेस आमदारांची मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक होणार होती. त्याआधी सचिन पायलट गेहलोत यांना भेटले. वाचा सविस्तर
 

बेंगळुरू हिंसाचार प्रकऱणी 16 जणांची नावे समोर
दोन दिवसांपूर्वी बेंगळुरूत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी सात एफआयआर दाखल केले आहेत. दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल केलेल्या या गुन्ह्यामध्ये सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या (SDPI) 16 जणांची नावे आहेत. मंगळवारी रात्री झालेल्या हिसाचारामध्ये अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणातील एसडीपीआयचे कनेक्शन दिल्लीतील हिंसाचाराशी होते. पोलिस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. वाचा सविस्तर
 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
सुशांतसिंह राजपूत ( Sushant Singh Rajput) प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने (Rhea chakrborty)  प्रकरणाची सुनावणी मुंबईतच व्हावी, अशी याचिका सुरुवातीला दाखल केली होती. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून तिच्या विरोधात मीडिया ट्रायल केली जात असल्याचा आरोप करत कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. वाचा सविस्तर सुशांतसिंह राजपूत प्रकरण, सुप्रीम कोर्टात काय चाललंय? 
 

कोरोना व्हॅक्सिनची घाई धोकादायक ठरणार?
रशियाने कोरोना व्हॅक्सिन(covid 19 vaccine)तयार केल्याचा दावा केल्यानंतर जगभरात त्यावरून वाद सुरू झाले. अमेरिकेपासून जर्मनीपर्यंत रशियाचं व्हॅक्सिन Sputnik-V वर शंका व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा रशियाकडे काही पुरावे मागितले आहेत. दरम्यान व्हॅक्सिन तयार करण्यासाठी सुरु झालेल्या घाईबाबत तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानुसार तिसऱ्या टप्प्यातील डेटा विश्लेषण होत नाही तोपर्यंत व्हॅक्सिनला सुरक्षित म्हणता येणार नाही. रशियाची कोरोना लशीची घाई ठरू शकते धोकादायक. वाचा सविस्तर

अमेरिकेनं एचवन-बी व्हिसा संदर्भात घेतला मोठा निर्णय!
अमेरिकेने एचवन-बी व्हिसा संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळं अमेरिकेत काम करू इच्छिणाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अमेरिकेतील आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्या म्हणून आता नवा नियम लागू केला आहे. हा निर्णय घेऊन ट्रम्प (Donald Trump) सरकारने थोडा दिलासा दिलाय. वाचा सविस्तर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: top news rajsthan bengluru pranab mukharjee pm modi russia america