भोर-महाड रस्ता वाहतुकीसाठी खुला; दरड हटविली

सुनील पाटकर
शनिवार, 24 जून 2017

दरड कोसळल्याने महाड-भोर मार्गे होणारी एस.टी. आणि अन्य वाहतूक ताम्हिणी तसेच महाबळेश्वर मार्गे वळविण्यात आली होती. महाड-भोर मार्गावर वाघजई तसेच वरंध घाटात पावसाळ्यात वारंवार दरडी कोसळत असतात.

महाड - भोर मार्गावर वाघजई घाटात उंबर्डे गावाजवळ कोसळलेली दरड हटविल्याने रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 23 जूनला दुपारी दीड वाजता ही घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाक़डून जेसीबीच्या साह्याने दरड हटविण्यात आली.

दरड कोसळल्याने महाड-भोर मार्गे होणारी एस.टी. आणि अन्य वाहतूक ताम्हिणी तसेच महाबळेश्वर मार्गे वळविण्यात आली होती. महाड-भोर मार्गावर वाघजई तसेच वरंध घाटात पावसाळ्यात वारंवार दरडी कोसळत असतात. पुणे, भोर, पंढरपूरकडे जाण्यासाठी या मार्गावरुन अनेक लहानमोठ्या वाहनांची वर्दळ सुरु असते. जोरदार पावसाला अद्याप सुरुवात झाली नसली तरीही या मार्गावरील वाघजई घाटात 23 जूनला दुपारी दीड वाजता दरड कोसळली. दरड कोसळल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही दरड कोसळल्याची माहिती एका एस.टी. बस चालकाने महाड परिवहन स्थानकात दिली. महाड आगाराने महाड बांधकाम विभागाला ही माहिती दिली.

या घाटात असलेले महाड बांधकाम विभागाचे मजूर घटनास्थळी दाखल झाले. परंतु दरड मोठी असुन दरड कोसळलेला भाग भोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असल्याने भोर येथून यंत्रसामुग्री आल्यानंतर ही दरड हटविण्याचे काम सुरु झाले. सायंकाळी सातपर्यंत येथील वाहतूक ठप्प होती. महाड आगारातून पुण्याला या मार्गे जाणारी एस. टी. वाहतूक ताम्हिणी तसेच महाबळेश्वरमार्गे वळविण्यात आली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
जयपूर पोलिसांच्या पोस्टर्समुळे बुमराहची नाराजी​
चीनमध्ये "माळीण'सदृश शोकांतिका; 100 मृत्युमुखी
काश्‍मीर:मशिदीबाहेर पोलिस अधिकाऱ्यास ठेचून मारले​
एकत्र आले ठाकरे, फडणवीस, गडकरी आणि नारायण राणे
"सुपर' श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत !
भारत-विंडीज सामन्यात पावसाची बॅटींग​
‘सकाळ’सारखी रचनात्मक, सकारात्मक पावले गरजेची - कारमॉन​
#स्पर्धापरीक्षा - जागतिक बॅंकेचा हवामान बदलासंबंधीचा कृती आराखडा​
वादग्रस्त कामांवरून महाजन, सवरांमध्ये जुंपली​

Web Title: Bhor-Mahad road is open for vehicle