पहिल्या श्रावण सोमवारी मार्लेश्वरला भाविकांची गर्दी

संदेश सप्रे
सोमवार, 24 जुलै 2017

देवरुखपासून १७ किमी अंतरावर मारळ गावाच्या हद्दीत सह्याद्रीच्या कड्यावरिल गुहेत हे स्वयंभू देवस्थान वसले आहे. तिन बाजुने सह्याद्रीचे अभेद्य कडे आणि त्यावरील हिरवाई, समोर बारामाही कोसळणारा धारेश्वर धबधबा अशा निसर्गरम्य वातावरणात हे देवस्थान वसले आहे. दरवर्षी पावसाळ्यात या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी येथे लाखो भाविक भेट देतात.

देवरुख (रत्नागिरी) : राज्यातील लाखो शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वरला आज श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी भाविकांची मांदियाळी पहायला मिळाली. मुसळधार पावसातही आज दिवसभरात हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित होते.

देवरुखपासून १७ किमी अंतरावर मारळ गावाच्या हद्दीत सह्याद्रीच्या कड्यावरिल गुहेत हे स्वयंभू देवस्थान वसले आहे. तिन बाजुने सह्याद्रीचे अभेद्य कडे आणि त्यावरील हिरवाई, समोर बारामाही कोसळणारा धारेश्वर धबधबा अशा निसर्गरम्य वातावरणात हे देवस्थान वसले आहे. दरवर्षी पावसाळ्यात या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी येथे लाखो भाविक भेट देतात.

श्रावण महिन्यात हि संख्या वाढत जाते. आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने सकाळी ७ वाजल्यापासून या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी सुरु झाली. दिवस भर मुसळधार पाऊस सुरु असूनही भाविकांची रिघ वाढतच होती. आजच्या पवित्र दिवशी देवावर अभिषेक करण्यासाठी मोठी रांग पहायला मिळाली. आज वाढणाऱ्या भाविकांची संख्या पाहुन या ठिकाणी स्वयंसेवी संस्थानी मोफत खिचडी प्रसाद वाटप उपक्रम राबवला. तसेच सर्वाना दर्शन मिळावे यासाठी मंदिर व्यवस्थापन समितीने उत्तम सोय केली होती. भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होवु नये यासाठी कमिटिचे सदस्य , पदाधिकारी जातीने लक्ष ठेवून होते. संध्याकाळी उशीरा पर्यंत येथे गर्दी पाहायला मिळाली.

मार्लेश्वरप्रमाणेच तालुक्यातील कसबा येथील पुरातन कर्णेश्वर; धामापूरमधील सोमेश्वर, संगमेश्वरमधील सप्तेश्वर, राजवाडीतील सोमेश्वर, शिरंबे येथील मल्लिकार्जुन अशा शंकरांच्या मंदिरात आज दिवसभर भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रमुख मंदिरान्मधे एक्का या पारंपरिक उपक्रमाला सुरुवात झाली आहे.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: Kokan news Marleshwar

टॅग्स