पहिले चक्रीवादळ निवारा केंद्र कोकणात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

पावणे चार कोटीचा खर्च :  जिल्ह्यात चार केंद्रांचा प्रस्ताव

रत्नागिरी : चक्रीवादळ, पुरापासून रक्षण करण्यासाठी किनारी भागात "सायक्‍लॉन शेल्टर' उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोकणातील पहिले सायक्‍लॉन शेल्टर सैतवडे (ता. रत्नागिरी) येथे उभारले जाणार आहे. त्यासाठी पावणे चार कोटी खर्च अपेक्षित आहे. प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापनकडे पाठविण्यात आला आहे. राज्यातील मान्यता मिळालेल्या 29 चक्रीवादळ निवारा केंद्रांपैकी चार केंद्रे रत्नागिरीत उभारण्यासाठी जागांचा शोध सुरु आहे.

चक्रीवादळ निवारण केंद्रासाठी रत्नागिरी जिल्ह्यात हर्णै, दाभोळ, वेळवीसह सैतवडे येथे पाहणी झाली. सैतवडेतील 25 पैकी 14 गुंठे शासकीय जमिनीवर हे शेल्टर उभारण्यात येईल. यासाठी आवश्‍यक निधी जागतिक बॅंक आणि राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. पाचशे लोक राहतील अशी त्याची क्षमता आहे. अधिक लोक आलेच तर त्या इमारतीच्या छपराचा उपयोग करता येईल. इमारत उभी करताना चक्रीवादळाबरोबरच पुराचा धोका लक्षात घेतला जातो. त्यासाठी ओडिशातील शेल्टरच्या धर्तीवर रत्नागिरीत इमारत उभारली जाणार आहे.

ओडीशात 2000 पूर्वी चक्रीवादळाने थैमान घातले होते. त्यामध्ये उध्वस्त झालेल्या नागरिकांच्या निवाऱ्याची सोय नव्हती. त्यावेळी केंद्र सरकारने चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात पश्‍चिम बंगालमध्ये केंद्र उभारली. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गुजरात राज्यांचा समावेश आहे. 2015-16 च्या राज्य अर्थसंकल्पात नऊ जिल्ह्यांमध्ये आश्रयस्थाने बांधण्यासाठी 28.16 कोटीची तरतूद केली.

जागतिक बॅंकेच्या साह्याने नॅशनल सायक्‍लोन रिस्क मिटींग प्रोजेक्‍ट (एनसीआरएमपी) अंतर्गत हा कार्यक्रम राबविला जात आहे. जागतिक बॅंकेचा 75 तर 25 टक्के राज्य सरकारचा वाटा आहे. चक्रीवादळात शाळा आणि इतर संस्थांचा तात्पुरत्या सुविधांसाठी वापर केला जातो. तो आता बंद केला जाणार आहे.

Web Title: konkan news cyclone shelters in ratnagiri district