
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारी (१२ एप्रिल) दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळवला जात आहे. हा समना लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात लखनौचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रिषभने सांगितले की परिस्थितीचा विचार करून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.