Raksha Bandhan : बॉलिवूडच्या 'या' चार सावत्र बहिण-भावांची अनोखी बाँडिंग

देशभरात रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. हा सण बहिण-भावाच्या नात्यातील प्रेम साजरे करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी बॉलिवूडच्या या सावत्र बहिणभावाचे जबरदस्त बाँडिंग बघायला मिळते.
Raksha Bandhan
Raksha Bandhanesakal

देशरात बहिणभावाचा रक्षाबंधन हा सण फार उत्साहात साजरा केला जातो. सर्वसामान्य लोकांच्या घरांप्रमाणेच सेलिब्रिटीजच्या घरीपण याचा नेगळाच उत्साह बघायला मिळतो. सख्या भावंडांत तर रक्षाबंधनाला बरेच प्रेम बघायला मिळते. पण बॉलिवूडच्या या सावत्र बहिण भावात जबरदस्त बाँडिंग बघायला मिळते. बी टाऊनमधले हे सावत्र बहिण भाऊ यांच्यातल्या या सुंदर बाँडिंगमुळे ते रक्षाबंधनाचा सण फार प्रेमाने साजरे करतात.

(Rakshabandhan 2023)

Raksha Bandhan
Akshaya - Hardeek: सोनेरी रंग, भव्य सजावट... अक्षया - हार्दिकची लग्नानंतरची पहिली शाही मंगळागौर, फोटो व्हायरल

जान्हवी कपूर व अर्जुन कपूर

जान्हवी कपूर व अर्जुन कपूर हे सावत्र बहिण भाऊ आहेत. बोनी कपूर व त्यांची पहिली पत्नी मोना यांना दोन मुले आहेत. अर्जुन व अंशला कपूर. तर दुसरी पत्नी श्रीदेवी पासून २ मुली जान्हवी व खुशी कपूर. जान्हवी व अर्जुन कपूर यांचे नाते पहीले एवढे चाकगले नव्हते. पण श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुनने त्याचे मोठ्या कर्तव्य जबाबदारीने निभावले. त्यामुळे अर्जुन व जान्हवी यांच्यातील अंतर दूर झाले. अर्जुन कपूर अनेकवेळा आपल्या बहिणींची काळजी घेताना दिसला आहे.

Raksha Bandhan
म्हणून अर्जुन कपूर मलायकाचं ब्रेक अप? सोशल मीडियावर रंगली चर्चा

सारा अली खान व तैमुर अली खान

सारा अली खान आपल्या सावत्र भावाला तैमुर अली खानला दरवर्षी राखी बांधते. साराचे करीना कपूर व तिच्या दोन्ही मुलांसोबत खूप चांगले बाँडिंग आहे. सारा नेहमीच तैमुरसोबतचे आपले क्युट फोटोज शेअर करत असते.

Raksha Bandhan
ट्रोलर्सनाच तैमुर, सुहानाचे फोटो पहायचे असतात- फराह खान

सनी देओल व इशा देओल

धर्मेंद्र व हेमा मालिनी यांचे लग्न बॉलिवूडमधले सर्वात चर्चेत असलेले लग्न होते. धर्मेंद्र यांच्याही दोन पत्नी होत्या. हेमा मालिनीपासून ईशा व अहना देओल या दोन मुली तर पहिल्या पत्नीपासून सनी व बॉबी देओल हे दोन मुले आहेत. या दोन्ही मुलांचे आपल्या दोन्ही सावत्र बहिणींशी बाँडिंग खूप चांगले आहे.

Raksha Bandhan
'सलमान माझ्यासाठी देवदूत';बॉबी देओल असं का म्हणाला?

आलिया भट व राहुल भट

हिंदी सिनेमाचे प्रसिध्द निर्माता महेश भट यांनी दोन लग्न केले आहेत. त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. पूजा व राहुल भट. तर दुसरी पत्नी सोनी राजदान यांच्यापासून आलिया व शाहीन भट या दोन मुली आहेत. आलिया व राहुल हे सावत्र बहिण भाऊ आहेत पण त्यांच्यात सख्या भावंडाप्रमाणे प्रेम आहे.

Raksha Bandhan
पिक्चर फ्लॉप झाल्यास कलाकारांचं मानधन...; आलिया भट 'लाईमलाईट'मध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com