Janmashtami 2023 : सांगलीत 'दीदी'नं फोडली दहीहंडी;  तासगावच्या नव्याची कमाल, पहा चित्तथरारक व्हिडिओ

या चिमुकलीला भिती हा शब्द माहितीच नाही
Janmashtami 2023
Janmashtami 2023esakal

Janmashtami 2023 :  शनिवारची रात्र... सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातील बाजाराचं ठिकाण..गर्दीनं हाऊसफुल्ल झालेलं मैदान अन् मधोमध बांधलेली उंचावर बांधलेली दहीहांडी. एकामागून एक गट सलामी देऊन जात होते, अन् तासगावच्या ऐका संघानं थर लावायला सुरूवात केली.

एकावर एक थर लागले अन् शेवटी सरसर करत एक चुणचुणीत मुलगा शेवटच्या थरावर गेला. स्टेजवर उभे असलेले त्यांचे कॅप्टन त्यांना बळ देत होते. त्यांच्या तोंडातून ‘दिदे चल, दिदे चल..नारळ घे हांडी फोड असे शब्द कानी आले अन् कळालं की तो मुलगा नाहीतर मुलगी आहे.

ही चुणचुणीत अन् कोंढाण्यावर चढलेल्या घोरपडीसारखे थरावर चढणारी मुलगी होती नव्या पांडूरंग पाटील. ती तासगावला राहते. पलूस येथे युवक राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या दहीहंडीत या चिमुकलीने हा कारनामा केलाय. या दहीहांडीला क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड अन् राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे चेअरमन प्रतिक पाटील हे उपस्थित होते.  

Janmashtami 2023
Dahihandi Festival : दादरमधील पर्यावरणपूरक दहीहंडी, महिला गोविंदा पथकांची सलामीची परंपरा कायम

अंगाने अगदी बारीक असूनही धडाडीचं काम केलेल्या या चिमुकलीला भिती हा शब्द माहितीच नाही. चार वर्षांची असल्यापासूनच नव्याने तिच्यातील चुणूक दाखवली होती. वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच नव्याने मोठ मोठ्या झाडांवर चढण्यास सुरूवात केली.

मुलगी आहे म्हणून हे काम तिने करायचे नाही, असं आम्ही तिला कधीच सागितलं नाही. तिचा झाडावर चढण्याचा सफाईदारपणा माझ्या लक्षात आला. अन् मी तिला दहीहंडीवर चढण्यास विचारले. तेव्हा कोणताही विलंब न करता ती हो म्हणाली. त्यानंतर वेळ न दवडता मी तिला प्रशिक्षण देऊ लागलो, असे नव्याचे वडील पांडूरंग पाटील यांनी सांगितले.

तासगावच्या शिवाजी युवक मंडळाला दहीहाडीचा ४१ वर्षांचा दांडगा अनुभव आहे. या मंडळातील कार्यकर्त्यांनीही नव्याला पाठींबा देत आपली लेक असल्यासारखेच तिला प्रशिक्षण दिले. केवळ प्रशिक्षणच नाहीतर सरावावेळीही तिच्या सुरक्षेची काळजी घेतली.

Janmashtami 2023
Dahihandi Festival : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीत येणार?
नव्यासोबत तिचा संघ
नव्यासोबत तिचा संघesakal

लहानपणापासून झाडावर चढतेय त्यामुळे वेगळं काही नव्हतं. पण भिती वाटत होती थोडी. बाबा आणि मंडळातील इतर सदस्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी हे करू शकले, असे नव्या सांगते.  जिथे सुरक्षेच्या कारणावरून पालक मुलांना अशा मैदानी खेळांपासून दूर ठेवतात. तिथे हे बाप लेकीचे उदाहरण म्हणजे समाजासाठी आदर्शच आहे.

अवघ्या २५ दिवसात ‘पोरगी शिकली’

सांगलीकरांच्या भाषेत सांगायचं तर पोरीनं नाव काढलं! इतर दहीहंडीवर असलेली तरूण मुलं वर्षांनुवर्षे प्रॅक्टीस करतात. तरी त्यांना ही गोष्ट जमत नाही पण केवळ ११ वर्षांच्या असलेल्या या पोरीनं २५ दिवसाच्या सरावात ही गोष्ट आत्मसात केली अन् १,५५,५५५ लाखांच्या दहीहंडीची खरी मानकरी झाली.   

Janmashtami 2023
Dahihandi Festival : रिमझिम पावसात कुठे चहाचा ताजेपणा, तर कुठे मद्याची नशा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com