गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

टीम ई-सकाळ
Friday, 6 September 2019

आणखी एका IAS अधिकाऱ्याचा राजीनामा... पाकिस्तानात फक्त इथं तुम्ही जाऊ शकता व्हिसाशिवाय!... औरंगजेबाला जे जमलं नाही, ते या सरकारनं करून दाखविलं! : अमाेल काेल्हे... विराटने शेअर केला हनिमूनचा हा किस्सा... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

आणखी एका IAS अधिकाऱ्याचा राजीनामा... पाकिस्तानात फक्त इथं तुम्ही जाऊ शकता व्हिसाशिवाय!... औरंगजेबाला जे जमलं नाही, ते या सरकारनं करून दाखविलं! : अमाेल काेल्हे... विराटने शेअर केला हनिमूनचा हा किस्सा... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- आणखी एका IAS अधिकाऱ्याचा राजीनामा

भारतातील लोकशाही धोक्यात येत चालली आहे. प्रशासकीय सेवेत अलीकडच्या काळात मुस्कटदाबी केली जात असून हे प्रमाण वाढत चालले आहे, अशी कारणे देत आयएएस अधिकारी आपल्या नोकरीचा राजीनामा देत आहेत.

(सविस्तर बातमी)

- पाकिस्तानात फक्त इथं तुम्ही जाऊ शकता व्हिसाशिवाय!

गेल्या काही दिवसांपासून या विषयावरून भारत-पाकिस्तान यांच्यात चर्चा सुरू होती. आता दोन्ही देशांच्या बैठकीत भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवेश देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

(सविस्तर बातमी)

- गड किल्ल्यांवर हाॅटेल यावर खासदार संभाजीराजे म्हणाले....

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मानबिंदू असलेले २५ किल्ले हेरिटेज हाॅटेल्स व लग्न समारंभासाठी दिर्घ मुदतीच्या करारानं खासगी कंपन्यांना विकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

(सविस्तर बातमी)

- Video : औरंगजेबाला जे जमलं नाही, ते या सरकारनं करून दाखविलं! : अमाेल काेल्हे

राज्यातील जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेल्या 25 किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल व डेस्टीनेश वेडींगचा निर्णय घेणा-या राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

(सविस्तर बातमी)

- #BanNetflixInIndia हिंदूंनो, नेटफ्लिक्सवर बंदी घाला! 

नेटफ्लिक्सवरील अनेक वेबसिरीजमधून हिंदू भावनांवर घाव घातला जातो, यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात व बदनामी होते. असा आरोप नेटकऱ्यांनी नेटफ्लिक्सवर केला आहे. यामुळे आज ट्विटरवर #BanNetflixInIndia असा हॅशटॅगही ट्रेंडिंग आहे.

(सविस्तर बातमी)

- केवळ एका ट्विटमुळं शेहला रशिदवर देशद्रोहाचा गुन्हा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी चळवळीतील विद्यार्थी आणि वाद काही नवीन नाही. गेल्या काही वर्षांत शेहला रशिद हे नाव त्याच वादातून प्रसिद्धीच्या झोतात आलंय.

(सविस्तर बातमी)

- विराटने शेअर केला हनिमूनचा हा किस्सा

विवाहबद्ध होताना दोघांनीही कमालीची गुप्तता पाळली होती. त्यानंतर ते दाेघे फिनलॅंड या ठिकाणी हनिमूनसाठी गेले हाेते. एका मुलाखती दरम्यान विराटने हनिमूनला गेल्यावर घडलेला रंजक किस्सा शेअर केला.

(सविस्तर बातमी)

महाराष्ट्र व देशातील महत्त्वाच्या बातम्या, घडामोडी, लेख, व्हिडिओ, तसेच क्रीडा, मनोरंजन, राजकारण विश्वातील सगळ्या ठळक बातम्या मिळवा एकाच ठिकाणी eSakal वर!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Marathi news of 6th September 2019