मुख्यमंत्री फेलोशिपसाठी यंदा परिक्षेचा पॅटर्न बदलणार

हर्षदा परब / किरण कारंडे
बुधवार, 21 जून 2017

सकाळमधील लेखानंतर प्रतिसाद वाढला
सकाळच्या सप्तरंग पुरवणीत मुख्यमंत्री फेलोशिपवर संदीप वासलेकर यांनी लिहिलेल्या लेखानंतर फेलोशिपसाठी येणाऱ्या अर्जांमध्ये वाढ झाल्याचे प्रिया खान यांनी सकाळच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री फेलोशिपसाठी देशातून आले अर्ज

मुंबई : मुख्यमंत्री फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परिक्षेचा पॅटर्न यंदा तिसऱ्या वर्षी बदलण्यात आल्याचचे मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान यांनी सांगितले. फेलोशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

मुख्यमंत्री फेलोशिपला राज्यातील विविध जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. परिक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इंजिनिअरिंग आणि आयटी विभागातील
विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांची पात्रता ठरविणाऱ्या टीमच्या लक्षात आले. दोन वर्षाच्या सततच्या अनुभवानंतर या पेपर पॅटर्नमध्ये बदल करण्याचा निर्णय फेलोशिप प्रकल्पासाठी काम करणाऱ्या टीमने घेतला. त्यानुसार यंदा होणाऱ्या फेलोशिप परिक्षेसाठी इतर विषयांवर आधारीत प्रश्नांसह, जनरल नॉलेजच्या प्रश्नांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रिया खान यांनी सांगितले. ही विभागणी पन्नास पन्नास टक्के असेल असेही त्यांनी सांगितले. ज्याने वेगवेगळ्या शाखांमधील विद्यार्थ्यांना ही परिक्षा देणं सोप्प जाईल. तसेच वेगवेगळ्या शाखांमधील विद्यार्थी या ऑनलाईन परिक्षेत पात्र होण्याची संधी मिळेल यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

यावर्षीसाठी पाच हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी अडीच हजार विद्यार्थी ऑनलाईन परिक्षा देण्यासाठी पात्र ठरले आहेत.

यंदा देशभरातून प्रतिसाद
मुख्यमंत्री फेलोशिपसाठी राज्यात शहरी भागातून विद्यार्थी येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे असले तरी राज्याच्या छोट्या जिल्ह्यांमधूनही विद्यार्थी अर्ज करतात. या फेलोशिपसाठी यंदा राज्याबाहेरुन विद्यार्थी आल्याची माहिती प्रिया खान यांनी दिली.

सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा
जिल्हा बँकांना केंद्राचा दिलासा; जुन्या नोटा घेणार​
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
योगासनांमुळे जग भारताबरोबर जोडले गेले: मोदी
कर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीनामा
धोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड
रुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा​
‘योगा’त रमले आयटीयन्स​
संपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी
हीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी?​
#स्पर्धापरीक्षा - 'हार्ट ऑफ एशिया' परिषद

Web Title: mumbai news chief minister fellowship maharashtra examination pattern