देसाई, रावते आणि कदमांना मंत्रीमंडळातून डच्चू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

पक्षवाढीची जबाबदारी, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीतही मंत्र्यांवर नाराजी

मुंबई: शिवसेनेच्या मंत्र्यावरील नाराजीचा स्फोट आज (शुक्रवार) शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समोर झाला. शिवसेना भवन मध्ये झालेल्या बैठकीत जिल्हा प्रमुखांनी मंत्र्यांच्या कामावर थेट नाराजी व्यक्त केली असून परीवहन मंत्री दिवाकर रावते यांना बोलूही दिले नाही. ही नाराजी महागात पडू नये म्हणून रावतेंसह उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना मंत्रीमंडळातून सन्मानपुर्वक डच्चू दिला जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी या मंत्र्यांवर पक्ष वाढीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यांवर पक्षातील पदाधिकारी प्रचंड नाराज आहे. मंत्री पक्षाच्या काहीच कामाचे नसल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांकडून केली जात होती. त्या पार्श्‍वभुमीवर आज उध्दव ठाकरे यांनी शिवसेना भवन मध्ये राज्य भरातील जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा प्रमुखांनी ठाकरे यांच्या समोरच कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली. यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे संकेत देतानाच हेवेदावे बंद करुन एकत्र येऊन काम करा असे आदेश उध्दव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना दिले.

या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परीषदेत उध्दव ठाकरे यांनी मंत्री आणि नेत्यांवर विभागा नुसार पक्षवाढीची जबाबदारी सोपवली असल्याचे जाहीर केले. यात विदर्भाची जबाबदारी रावते,ठाण्यासह कोकणची जबाबदारी देसाई आणि कदम यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळातून सन्मानपुर्वक बाहेर काढण्यासाठी हा मार्ग असलाचे मानले जात आहे. त्याच बरोबर खासदार संजय राऊत यांना पुण्यासह उत्तर महाराष्ट्र आणि गजनान किर्तीकर यांच्यावर सातारा सांगली कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आली आहे.

मंत्री पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची
मंत्री विरुध्द पदाधिकारी असा आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलेला असताना राज्यमंत्री गुलाबराव पाटील चांगलेच संतापले. मंत्र्यांवर कसेल आरोप करता त्यांच्या रिपोर्ट कार्ड पक्षप्रमुखंकडे दिला जातो. जिल्हा प्रमुख स्वत:ला काय समजता. अशा शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना दम भरला. मात्र, त्यांना उध्दव ठाकरे यांनीच शांत केले. मात्र, ही पक्ष पातळीवर आढावा बैठक होती. त्यात असे काहीच घडले नाही असे ठाकरे यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: mumbai news subhash desai divakar rawate ramdas kadam and shivsena