‘हत्ती इलो रे' मधून वेध लोकशाहीतील झुंडशाहीचा...! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

अजय कांडर यांची ‘हत्ती इलो’ ही दीर्घ कविता गाजली. या काव्यसंग्रहाला पुढे अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले. याच कवितेचे नाट्यरूपांतर म्हणजेच ‘हत्ती इलो रे’ हे नाटक. 

कोल्हापूर - लोकशाहीतील झुंडशाही ‘हत्ती’ या रूपकातून मांडली आहे. वारणानगरच्या प्रज्ञान कला अकादमीने या नाटकाचा देखणा प्रयोग स्पर्धेत शुक्रवारी सादर केला. जागतिकीकरण, उदारीकरणाच्या रेट्यात जगभराचा विचार  केला, तर भांडवलशाहीचा प्रभाव राजकारणावरही हमखास दिसतो. तुमची विचारधारा कुठलीही असो. त्यापेक्षा पैसा आणि सत्तेलाच मोठे महत्त्व आले आहे. लोकशाहीच्या नावाखाली फोफावलेली झुंडशाही हेच आता समाजासमोरील खरे आव्हान आहे.

एकूणच जगभरातील राजकीय स्थित्यंतराचा समाजव्यवस्थेवर कसा परिणाम झाला. त्यातून समाजाचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अधःपतन कसे होत गेले, यावर हे नाटक भाष्य करते आणि साऱ्यांनाच अंतर्मुखही करते.

पैसा, सत्तेच्या जिवावर मस्तावलेले ‘हत्ती’

अजय कांडर यांची ‘हत्ती इलो’ ही दीर्घ कविता गाजली. या काव्यसंग्रहाला पुढे अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले. याच कवितेचे नाट्यरूपांतर म्हणजेच ‘हत्ती इलो रे’ हे नाटक.  श्री. कांडर यांनी ‘हत्ती इलो’ या कवितेत याच झुंडशाहीचे वर्णन केले आहे. पैसा आणि सत्तेच्या जिवावर मस्तावलेले असेच ‘हत्ती’ या नाटकात अनुभवायला मिळतात. एकूणच भोवतालचा विचार केला तर भावना, आस्था आणि विचारांचे निर्वंशीकरण कशा पद्धतीने सुरू झाले आहे, याचा सर्वांगाने वेध या नाटकातून घेतला गेला. वारणानगरसारख्या भागात नाटक रुजवण्याचा प्रयत्न करणारी ‘प्रज्ञान’ची टीम प्रत्येक वर्षी असेच विषय घेऊन स्पर्धेत उतरते आणि चांगल्या प्रयोगांचा अनुभव देते. यंदाही त्यांनी ही परंपरा ‘हत्ती इलो रे’च्या निमित्ताने जपली. 

पात्र परिचय :

नीलेश आवटी (कोंगो), स्नेहल कुलकर्णी (राणी, बाई), मंगेश कांबळे (राजा, पत्रकार), श्रीकांत शेवडे (पाटील, आबा), निवास लोखंडे (नोकर, कारभारी), नितीन धुमाळ (भटजी), जगदीश पाटील (ढोलकीवाले), अमिता इंगळे (बाई), विपुल हळदणकर (चित्रकार, अदृश्‍य), आशिष जेटली (डुंगा, विद्यार्थी).

 दिग्दर्शक - नीलेश आवटी
 वेशभूषा - मंगेश कांबळे
 प्रकाश योजना - विनायक सुतार, प्रवीण वरेकर
 नेपथ्य - विपुल हळदणकर
 रंगभूषा - नेहा आवटी

राज्य नाट्य स्पर्धेच्या बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा -

हूज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिआ वूल्फ मधून सुंदर खेळाची अनुभूती 

नातीगोती मध्ये उलघडले मतीमंद अन् त्यांच्या पालकांचे भावविश्व 

‘तुघलक’ नाटकाचा देखणा प्रयोग 

‘विच्छा माझी पुरी करा’ तून चंदगडची पोरं हुश्शारचा संदेश 

‘लग्न शांतूच्या मेहुणीचं’ अस्सल ग्रामीण बाजातील नाटक 

‘थिंक पॉईंट’ नाटकात घेतलाय या प्रश्नांचा वेध 

एका फक्कड प्रयोगाची अनुभूती नटरंगने दिली 

राज्य नाट्य स्पर्धेत प्रथमच यांची दमदार एंट्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hatti elo Re In State drama competition