
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. छोटा पडदा ते मोठा पडदा अशी यशस्वी घोडदौड करणारा सुशांत लंबी रेस का घोडा होता. परंतु अचानक त्याने मैदानातून एक्झिट घेतली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक जण दुःख व्यक्त करीत आहेत.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. छोटा पडदा ते मोठा पडदा अशी यशस्वी घोडदौड करणारा सुशांत लंबी रेस का घोडा होता. परंतु अचानक त्याने मैदानातून एक्झिट घेतली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक जण दुःख व्यक्त करीत आहेत. त्याने आत्महत्या का केली असावी. त्याला काही खासगी तसेच आर्थिक अडचणी होत्या का? मानसिक तणावाखाली तो होता का ? अशा तर्कवितर्कांना आता बॉलीवूडमध्ये वेग आला आहे.
वाचा ः ब्रेकिंग: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळफास घेऊन आत्महत्या
सुशांतने हिंदी चित्रपटसृष्टीत खूप संघर्ष केला आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत त्याने यशस्वी वाटचाल केली होती. त्याला चित्रपटदेखील चांगले मिळालेले होते. त्याचे काही चित्रपट प्रेरणादायी होती. 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट कित्येक तरुणांना प्रेरणा देणारा होता तसेच 'छिछोरे' हा चित्रपट आपले जीवन संपवण्याचा विचार मनात आणणाऱ्यांना आयुष्य किती सुंदर आहे, असा सकारात्मक विचार देणारा होता. असे चित्रपट करणाऱ्या सुशांतने हे पाऊल उचलावे याबद्दल हिंदी चित्रपटसृष्टीत सगळे आश्चर्य व्यक्त करीत आहेत. त्याची माजी मॅनेजर दिशा सॅलियनने नुकतीच आत्महत्या केली. त्यावेळी सोशल मीडियावर सुशांतने तिला श्रद्धांजली वाहिली होती.
वाचा ः सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर 'या' आहेत सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया.
सुशांतचा दिल बेचारा हा चित्रपट पुढील वर्षी येणार आहे आणि त्याच्या हाती अजूनही काही चांगले प्रोजेक्ट आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत गेले काही महिने मानसिक तणावाखाली होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. मानसिक तणाव दूर करण्यासाठी तो गोळ्यांचे सेवनही करीत होता. त्यामुळे त्याला आपले वजन वाढते की काय अशी भीतीही होती. या तणावातून त्याने आपले जीवन संपविले की काय असाही एक कयास बांधला जात आहे.
वाचा ः सुशांतच्या आत्महत्येच्या केवळ तीन तासांपूर्वी अंकिता लोखंडेनं ठेवलं होतं 'हे' स्टेटस...
खरंतर चित्रपटसृष्टी म्हणजे एक ग्लॅमर आणि पैसा. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी याकडे वळतात आणि काम मिळाले नाही की नैराश्येमध्ये आत्महत्यासारखा अघोरी मार्ग स्वीकारतात. परंतु सुशांतकडे चांगले चित्रपट होते आणि तो कामही करीत होता. मग अचानक त्याने असे पाऊल का उचलले, असाही प्रश्न विचारला जात आहे.
वाचा ः लोकल सुरु होणार का? मध्य रेल्वेने दिली महत्वाची माहिती...
मैत्रीच्या नात्यातून तणावाखाली?
सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी पवित्र-रिश्ता या मालिकेत काम केले. तेव्हा त्यांची घट्ट मैत्री झाली होती. त्यानंतर ते एकमेकांना डेट करीत होते. त्यांची लव्हस्टोरी हा चित्रपटसृष्टीतील चर्चेचा विषय होता. त्यानंतर ते वेगळे झाले. त्यानंतर सुशांतची क्रिती सेननबरोबर मैत्री जुळली होती. पण ही मैत्रीही टिकली नाही आणि आता रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग यांची मैत्री जुळलेली होती. त्यामुळे तो तणावाखाली होता का ? त्यातूनच त्याने आत्महत्या केली का ? अशी चर्चा सगळीकडे रंगलेली आहे.
वाचा ः कॉफीतील वादळानंतर आलो ठिकाणावर!! वाचा कोणी दिली कबुली...
नोव्हेंबर महिन्यात लग्न?
सुशांत नोव्हेबर महिन्यामध्ये लग्न करणार होता, असा दावा त्याच्या जवळच्या नातेवाईकाने केला आहे. मात्र, काही महिन्यांपासून तो कमालीचा तणावाखाली होता. त्यामागे एक मुलगी कारणीभूत असल्याचा आरोपही त्याच्या नातेवाईकाने केला आहे. सुशांतची बहीण आणि वडील उद्या मुंबईला येणार आहेत. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.