'रॉकस्टार' फेम नर्गिस सायकल चालवत होती, एक चूक घडली आणि पूढे जे घडलं...

नेमक असं काय घडलं की नर्गिसने लोकांना मोटिव्हेट करायला सुरुवात केली.
nargis fakhri
nargis fakhrisakal
Updated on: 

२०११ साली आलेला 'रॉकस्टार' हा चित्रपट अभिनेता रणबीर कपूरला करियरसाठी मोठा लकी ठरला. पण रणबीरसोबतच या चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या नर्गिस फाखरीसाठीदेखील हा चित्रपट मोठा कलाटणी देणारा ठरला. चित्रपटातील दोघांचा अभिनय आणि केमिस्ट्री लोकांना भलतीच आवडली. नर्गिसने तर आपल्या पहिल्याच चित्रपटात बाजी मारत प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा तयार केली.

nargis fakhri
मोठी बातमी! आर्यन खानला क्लिनचिट;NCB ने आरोपपत्रातून नाव वगळलं

भलेही नर्गिस लाइमलाईटमध्ये कमी असली तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच सक्रिय असते. इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच जोडलेली असते. आताही तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ टाकलाय, ज्यात ती सायकलिंग करताना दिसत आहे. पण पुढे जे घडलं ते खूप भयानक होत. नर्गिसचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

nargis fakhri
लवकरच पार पडणार नेहा-यशचा साखरपुडा, VIDEO

नर्गिसने आपल्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये नर्गिस आपला उजवा पाय पकडून रस्त्यावर बसून हसताना दिसतेय. तिच्यापुढेच एक सायकल पडली आहे. शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये नर्गिसने लिहिले की, 'जेव्हा तुम्ही पडता तेव्हा ते हसून आणि स्टाईलने करा, पण लक्षात ठेवा नेहमी स्वतःला उचला आणि पुढे चालत रहा!'

nargis fakhri
या ७ आयटी कंपन्या करिअरसाठी देतात मोठी संधी; लवकरच होणार भरती

नर्गिसने शेअर केलेल्या या फोटोवरून समजतंय कि, ती सायकल चालवताना पडली आहे. पण आपल्या या फोटोच्या माध्यमातून ती लोकांना मोटिव्हेट करताना दिसतेय. पण जर आपण नर्गिसचा पुढचा व्हिडिओ बघाल तर एक गोष्ट लक्षात ठेवालं कि, सायकल चालवताना म्हणा किंवा बाईक चालवताना व्हिडिओ बनवायची चूक अजिबात करू नका. नाहीतर अपघात होऊ शकतो.

nargis fakhri
भारतीय रेल्वे करवणार अयोद्धापासून रामेश्वरमपर्यंतचा प्रवास, जाणून घ्या संपूर्ण पॅकेज

खरं तर व्हिडिओत नर्गिस सायकल चालवताना दिसतेय आणि कोणीतरी मागून तिचा व्हिडिओ काढत आहे. या दरम्यान व्हिडिओ काढणारी व्यक्ती नर्गिसला आवाज देते. त्यानंतर नर्गिस मागे वळून पाहते आणि तेव्हढ्यात तिचा बॅलन्स जातो, ती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खांब्याला जाऊन धडकते.

व्हिडिओ बघितल्यानंतर वाटतं कि, नर्गिसला मोठी दुखापत झाली आहे. तिच्या फॅन्सने सुद्धा कमेंट्स करून, तू ठीक आहेस का? असे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे?

nargis fakhri
जेनेलिया डिसूजाचे बॉलिवूडमध्ये पुनरागमन, म्हणाली...

दरम्यान, नर्गिस नुकताच कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा पाहायला मिळाली होती. क्रीम कलरच्या स्टाईलिश लॉंग गाऊनमध्ये तिने सर्वांचेच लक्ष वेधलं होत.

नर्गिसच्या चित्रपट करियरबद्दल बोलायचं झालं तर रॉकस्टारनंतर २०१३ मध्ये ती 'मद्रास कॅफे' आणि 'फटा पोस्टर निकला हिरो'मध्ये पाहायला मिळाली होती. त्यानंतर २०१४ साली 'मैं तेरा हीरो' आणि 'किक', २०१६ साली 'हाउसफुल ३' मध्येही तिने काम केलं होत. तिने बरेच म्युझिक व्हिडिओसुद्धा केलेत, लवकरचं ती एका तेलगू चित्रपटात देखील पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.