नांदेड-हैदराबाद महामार्गावर अपघात; तीन ठार, तीन जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

सर्वजण आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यातील रहीवासी

नांदेड : नांदेड-हैदराबाद महामार्गावर मोटारीने ट्रकला समोरून जोरदार धडक दिली असून, या अपघातात तीन ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना आज (शुक्रवार) पहाटे घडली.

शिर्डी येथून दर्शन घेऊन परतत असताना आज पहाटे नायगाव जवळील पळसगाव फाट्यावर हा अपघात झाला. अपघातात तीन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कर्नुल जिल्हयातील रणजीतकुमार हे कुटूंबासह शिर्डीला दर्शनासाठी गेले होते. शिर्डीवरुन परतत असताना अपघात झाला. मोटार चालक बुध्दु कॅटल याचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने मोटारीने  दुभाजकाला धडक दिली आणि त्यानंतर नायगावकडून नांदेडकडे जाणा-या ट्रकला समोरुन धडक दिली. या धडकेत मोटार चालक बुध्दु कॅटल, अनुराधा रजणीतकुमार आणि सात वर्षाची मुलगी रुषीता रंजीतकुमार असे तीघे जण जागीच ठार झाले. रणजीत कुमार अन्य दोन जखमींना नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: aurangabad news accident in nanded hyderabad road