औरंगाबाद: विमानतळ प्राधिकरणात नोकरीसाठीचे कॉल; तरुणांची दिशाभूल

अनिल जमधडे
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

  • फेक जाहिरातींनी घातली भूरळ
  • मराठी तरुणांची सुरु आहे, फसवणूक
  • दररोज चार पाच जणांच्या चकारा
  • विमानतळाचे अधिकारी वैतागले

औरंगाबाद : औरंगाबाद अंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध पदासाठी भरती असल्याच्या जाहिराती छापून तरुणांची दिशाभूल सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार सुरु झाला आहे. राज्याच्या कान्याकोपऱ्यातील तरुण ईमेलवर आलेले कॉल लेटर घेऊन विमानतळ प्राधिकरणाकडे येत असून, अशी कुठल्याही प्रकारची भरती नसल्याचे समजल्यावर तरुणांचा फसवले गेल्याचा भ्रमनिरास होत आहे.

पर्यटनाच्या राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील विमानतळावर विविध पदांच्या भरती असल्याच्या जाहिराती विविध जिल्ह्यातील वर्तमानपत्रामध्ये येत आहेत. या जाहिरातीच्या अनुशंगाने दरोज किमान चार ते पाच जण विमानळावर चौकशी करण्यासाठी येत आहेत, काहींनी तर ईमेलवर आलेल्या ऑर्डरही केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना दाखवल्याचे सुत्रांनी सांगीतले. या ठिकाणी चौकशीसाठी आलेल्या तरुणांना अशी कुठलीही भरती नसल्याचे सांगीतल्या गेले, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आले. बुधवारी (ता. सहा) दुपारी एक वाजेपर्यंत पाच तरुण अशा पद्धतीने येऊन गेल्याचे सुत्रांनी सांगीतले.

गेल्या काही दिवसांपासून अशा पद्धतीने तरुण विमानतळावर चौकशीसाठी येत आहे. या तरुणांची अधिक चौकशी केली तेंव्हा कुणी मुंबईत जाहिरात वाचली तर कुणी अन्य कुठल्या तरी शहरतील वर्तमानपत्रात औरंगाबाद विमानतळावरील भरतीची जाहिरात वाचल्याचे सांगीतले. जाहिरात वाचून दिलेल्या अकाऊंट क्रमांकावर काही रकमाही या तरुणांनी भरलेल्या होत्या, असे सुत्रांनी सांगीतले. विमानतळाची भरती अशा पद्धतीने होत नाही, त्यामुळे कुणीही जाहिरातीवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन विमानतळ प्राधिकरणाने केले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पाकसोबत मैत्री केल्यास काश्‍मीरमध्ये शांतता नांदेल - अब्दुल्ला
महिलेच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान
गिरीश महाजनांचा ठेका अन्‌ पोलिस निरीक्षकाची दौलतजादा ! 
माझ्यावर आरोप करण्यात काहींना आनंद वाटतो - खडसे
गुजरात सरकारची 'ब्लू व्हेल'वर बंदी
जुहू येथील इमारतीला आग; पाच जणांचा मृत्यू
ठाणे: कळव्यात महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या
जनसागर लोटला
दोन्ही देशांचे हित एकातच : नरेंद्र मोदी
गणेश विसर्जनादरम्यान राज्यात 16 जणांचा मृत्यू
ब्रॅण्डबाजा! (ढिंग टांग!)

Web Title: aurangabad news fake Call of the airport to the airport authority