गॅस गळतीच्या अफवेमूळे तासभर थांबली मराठवाडा एक्‍स्प्रेस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

औरंगाबाद: धर्माबाद-मनामड नियमीत धावणाऱ्या मराठवाडा एक्‍स्प्रेस रेल्वे आज (शुक्रवार) गॅसगळती होत असल्याच्या आफवेमूळे चिकलाठाणा जवळ तासभर थांबविण्यात आली.

खोडसाळ प्रवाशामुळे हा प्रकार घडल्याने प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. यामूळे काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले. मात्र, कोणत्याच प्रकारची गॅस गळती होत नसल्याचे निष्पन्न झाल्यावर ही रेल्वे मनमाडकडे सोडण्यात आली.

नांदेडहून निघालेल्या ही रेल्वे सकाळी निघाली होती. साडे नऊच्या दरम्यान गॅसगळतीची अफवा पसरली. यांची माहिती औरंगाबाद रेल्वे स्थानक प्रमुख लक्ष्मीकांत जाखडे यांना कळविण्यात आली. त्यांनी तात्काळ चिकलठाणा रेल्वे स्थानकावर धाव घेत चालकासह रेल्वेतील पेन्ट्रीकारसह खाद्य पदार्थाच्या कोचची पाहणी केली. मात्र, यात कोणतीच गॅस गळती होत नसून, कोणताही धोका नसल्याचे निष्पन्न झाले. यामूळे प्रवाशांना रेल्वेत बसण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर ही गाडी रेल्वे स्थानकाकडे रवाना झाली.

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर आल्यानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली. तेव्हाची काहीच अढळून आले नाही. कोणतीही खोडसाळपणे गाडीची चेन ओढून ही अफवा पसरवली होती. यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. स्टेशन मास्तर सोबत रेल्वे प्रवाशी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी, इरफान खान, अभिजित दातार, मुजबिल खान, लोहमार्ग पोलिस निरिक्षक भगवान कांबळे, दिलीप लोणारे, आरपीएफचे निरिक्षक श्री.शर्मा, जवान गुंजाळ, निरिक्षक अशोक निकम यांनी सहकार्य केले.

'ई सकाळ'वरील महत्वाच्या ताज्या बातम्या
बलात्काराचा आरोप करत जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमध्ये व्हॉटसऍपचे हॅकिंग; दक्षतेचे आवाहन
सामान्यांच्या जेवणात दिसू लागले वरण
वारीद्वारे केली अपंगत्वावर मात
परभणी: पत्नीची पेटवून घेऊन तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या
कल्याणमध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे; वाहतुकीची कोंडी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार
'बीफ' बाळगल्याच्या आरोपाखाली जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमधील सोनसाळखीची चोरी सीसीटीव्हीत कैद (Video)
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू
 
Web Title: aurangabad news marathwada express stop