पाच महिन्यात दुसऱ्यांदा पाटोदा उपविभागीय कार्यालयाला लावली आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

पंचायत समितीचे महत्वाचे दस्तावेज जळून खाक

पाटोदा (बीड): पाटोदा उपविभागीय कार्यालयात आज (सोमवार) पहाटे पेट्रोलचे फुगे टाकून लावण्यात आलेल्या भीषण आगीत पाटोदा पंचायत समितीचे अत्यंत महत्वाचे दस्तावेजासह उपविभागीय कार्यालयाचे काही दस्तावेज तसेच संपूर्ण फर्निचर उपविभागीय अधिकारी यांच्या दालनातील खुर्च्या, टेबल याच्यासह या इमारतीचे अर्धे छतहि जाळून खाक झाले आहे.

पंचायत समितीचे महत्वाचे दस्तावेज जळून खाक

पाटोदा (बीड): पाटोदा उपविभागीय कार्यालयात आज (सोमवार) पहाटे पेट्रोलचे फुगे टाकून लावण्यात आलेल्या भीषण आगीत पाटोदा पंचायत समितीचे अत्यंत महत्वाचे दस्तावेजासह उपविभागीय कार्यालयाचे काही दस्तावेज तसेच संपूर्ण फर्निचर उपविभागीय अधिकारी यांच्या दालनातील खुर्च्या, टेबल याच्यासह या इमारतीचे अर्धे छतहि जाळून खाक झाले आहे.

मागील पाच महिन्यात दुसऱ्यांदा हे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाल्याने प्रचंड खळबळ उडाली असून, यामध्ये पाणी पुरवठा विभागाच्या महत्वाचे दस्तावेज तसेच म.ग्रा. रोहयो चे व बोगस चारा छावण्याचे दस्तावेज जाळून टाकण्यात आले आहे. हे जळीत कांड काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी व गुत्तेदार यांनी घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पाटोदा उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी पाटोदा पंचायत समितीचे महत्वाचे दस्तावेज ठेवण्यात आले होते. आज पहाटेच्या सुमारास या कार्यालयाला भीषण आग लागल्याचे आजू बाजूच्या रहिवाश्यांना लक्षात आले. यावेळी उपविभागीय कार्यालयात रात्र पाळीच्या कर्मचारीही हजार नव्हते. यानंतर लोकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस व महसूलचे कर्मचारी घटनास्थळी येऊ पर्यंत या आगीत कार्यालयाची अर्धी बाजू व त्यातील दस्तावेज फर्निचर याचा अक्षरशः कोळसा झाला होता. विशेष बाब म्हणजे याच वर्षी १६ मार्च २०१७ रोजी म्हणजेच अवघ्या चार ते पाच महिन्यापूर्वीच हेच कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला होता. त्याचीही अद्याप कोणतीही चौकशी झाली नाही व त्यातच आता थेट पेट्रोल चे फुगे टाकून अज्ञातांनी हे कार्यालय जाळल्याने सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती समझताच उपविभागीय अधिकारी राजेंद्र वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पुढील कारवाईची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने हे काम या प्रकारांतील भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व गुत्तेदारांनी केल्याची चर्चा सुरु होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :


आरक्षण संपविण्याचा छुपा अजेंडा?

पाचशे गरजू विद्यार्थ्यांना 'मदतीचा आधार'!

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु; नागरिकांचे हाल

क्रांतिदिनी मुंबईत घुमणार मराठ्यांचा निःशब्द एल्गार; दहा लाखांहून अधिक नोंदणी

औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत दुष्काळमुक्त होऊ शकतो: फडणवीस

खडसेंबाबतचा फैसला मुख्यमंत्र्यांच्या हाती

देश वाचवायचा असेल तर पंतप्रधानांनी देशात राहणे गरजेचे

महेतांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी- पृथ्वीराज चव्हाण

Web Title: beed news patoda Sub-divisional office fire