हिंगोली: कळमनुरीत विजेचा धक्‍का लागून विवाहितेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

येथील इंदिरानगर भागात घराची साफसफाई करताना विजेचा धक्‍का लागून 25 वर्षाच्या विवाहितेचा आज (बुधवार) रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कळमनुरी (जि. हिंगोली) - येथील इंदिरानगर भागात घराची साफसफाई करताना विजेचा धक्‍का लागून 25 वर्षाच्या विवाहितेचा आज (बुधवार) रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील इंदिरानगर भागात वास्तव्यास असलेल्या श्रीनाथ कुटुंबीयामधील पूजा गजानन श्रीनाथ (वय 25) या घराची साफसफाई करीत होत्या. घरातील फरशी पाण्याने धुतल्यानंतर घरात जमा झालेले पाणी बाहेर काढण्यासाठी टीनपत्राजवळ ठेवलेली गजाळी काढण्याच्या प्रयत्नात त्यांना विजेचा जोरदार धक्‍का लागला. हा प्रकार समजताच तिच्या घरातील सदस्यांनी व आजूबाजूच्या नागरिकांनी काठीच्या साह्याने तिला बाजूला केले. गंभीर जखमी झालेल्या पूजाला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद मेने यांनी प्राथमिक उपचार करुन तातडीने हिंगोली येथील पुढील उपचारासाठी पाठविले.

हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. दरम्यान इंदिरानगर भागात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्‍त होत आहे.

■ ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​
Web Title: hingoli news kalamnuri news sakal news women death

टॅग्स