शेतकरी व अयशस्वी उद्योजकाने मागितले मुख्यमंत्र्यांकडे ईच्छामरण

शेतकरी व अयशस्वी उद्योजकाने मागितले मुख्यमंत्र्यांकडे ईच्छामरण
शेतकरी व अयशस्वी उद्योजकाने मागितले मुख्यमंत्र्यांकडे ईच्छामरण
  • बँकेच्या जुलमी धोरणास कंटाळून उचलले पाऊल
  • मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उद्योगमंत्र्या दिले  निवेदन
  • धर्माबाद येथील शेतकरी, बँक अधिकारी घामाघुम

नांदेड: बँकेच्या निकामी व जुलमी धोरणास कंटाळून धर्माबाद येथील एका अयशस्वी उद्योजक तथा शेतकऱ्यांने ईच्छामरण देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. या मागणीमुळे बँक अधिकारी घामाघुम झाले असून, पोलिस अधिक्षक यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे राहणारे शेतकरी तथा बंद पडलेल्या पौर्णिमा इंडस्ट्रीजचे मालक अनिलकुमार भोजराज पाटील यांनी नांदेड येथील सेंट्रल बँकेच्या जाचाला कंटाळून चक्क राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उद्योगमंत्री यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ईच्छामरण मागितले आहे. बँकेने लघुउद्योजक शेतकऱ्यांची जमीन व उद्योगघटक बेकायदेशीरपणे जप्ती करून सात पट रक्कमेच्या वसुलीसाठी प्रकरण न्यायालयात न्याय प्रविष्ठ असतांना जमिनीचा लिलाव करून बेघर केले आहे. तसेच एकरक्कमी कर्ज परतफेड प्रस्ताव जाणिवपूर्वक नाकारला आहे. एवढेच नाही तर शासनाचे तसेच रिझर्व बँकेचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याएेवजी बँकेच्या लोकांनी आर्थीक संकटात व दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी उद्योजकांची संपत्ती नियमबाह्य पधदतीने जप्त करून लिलाव करण्याचा घाट घातला आहे. तसेच खाजगी गुंडाना हाताशी धरून माझे जीवन जगणे मुश्ककील केले आहे. त्यातच मागील चार ते पाच वर्षापासून मराठवाड्यात सततचे आवर्षन व दुष्काळी परिस्थितीमुळे कर्ज परतफेडीसाठी अत्यंत प्रतिकुल परिस्थिती होती. तद्दनंतरसुध्दा मी माझी जमीन व इतर संपत्ती विक्री करून बँकेत तीस लाख रूपये जमा केले. अगोदरच्या रक्कमेला अव्वाच्यासव्वा व्याज लावून मला जीवनातून बाद करण्याचा घाट बँकेने घातला आहे. सध्या माझी आई कँसरग्रस्त असून माझे कुटूंब बेघर झाले आहे. ३१ जुलै रोजी माझ्या संपतीचा जाहिर होणारा लिलाव थांबविण्यात यावा, एक कोटीचा प्रस्ताव बँक निकषानुसार देण्याचा आदेश द्यावा, माझे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या बँकेचे व्यवस्थापन, त्यांचे खाजगी वसुली दलाल आणि लॉ ऑफीसर यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी, नियमाप्रमाणे बँकेचे जे काही कर्ज आहे ते मी ३० जूलै पूर्वी परत करण्यास तयार आहे. मला न्याय द्यावा किंवा ईच्छामरणास संमती द्यावी असेही निवेदनात म्हटले आहे.

शेतकरी अनिल भोजराज:
बँकेच्या या अडेलतट्टु भुमिकेमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. राज्यातील शेतकऱ्यांना आत्महत्येची पाळी खऱ्या अर्थाने बँक प्रशासनाकडून येत आहे. वरिष्ठ बँकेचे नियम धाब्यावर बसवून मनमानी सुरू असल्याने व व्याजाची सातशेपट रक्कम आकारून माझे आयुष्य उध्द्वस्त केले आहे. म्हणून मी ईच्छामरणाची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

अलोककुमार (सेंट्रल बँकेचे मुख्य व्यवस्थापक) :
या प्रकरणात बँकेची कुठलीच प्रतिक्रिया नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, संबंधित प्रकरणाची माहिती पोलिस अधिक्षक व पोलिस निरीक्षक वजिराबाद यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com