कंधार तालुक्यातील साडेतीन हजार विद्यार्थ्यांचे अस्तित्व धोक्यात

सत्यनारायण मानसपुरे
शुक्रवार, 16 जून 2017

शासनाच्या उदासीन धोरणामुळे 48 शाळा शालेय पाठ्यपुस्तकापासून वंचित

कंधार (नांदेड): कंधार तालुक्यातील ३१० पैकी २६२ शाळांतील १६ हजार ५३२ विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले असले तरी त्यातील ४८ विना अनुदानीत, अंशतः अनुदानीत शाळांतील जवळपास तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक याेजनांपासून वंचित राहिल्यामुळे त्यांचे शैक्षणिक अस्तित्व धोक्यात आले आहे. मोफत पाठ्यपुस्तक याेजनेमुळे बाजारपेठेत पहिली ते आठवी इयत्ताचे पुस्तके उपलब्ध नसल्यामुळे संबंधित शाळांतील विद्यार्थी व पालकांची तारांबळ उडाली आहे.

शासनाने काढलेलेली पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक याेजनेमुळे तळागाळातील ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. पुस्तकाअभावी शाळेपासून, अभ्यासक्रमापासून हजारो विद्यार्थी वंचित राहिल्या जात होते. ते विद्यार्थीही या याेजनेमुळे शाळेशी जाेडले गेले. पण त्यातही मोफत पाठ्यपुस्तक याेजनेत उदासीन धोरणही दिसून येत आहे. शासनस्तरीय नियमामुळे विना अनुदानीत व अंशतः अनुदानीत शाळांतील विद्यार्थी या याेजनांपासून वंचित राहिलेले आहेत. तालुक्यातील तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे ना घर का, ना घाट का, अशी अवस्था झाली आहे.

कंधार तालुक्यात एकूण ३१० शाळा असून, त्यात १७ केंद्र असून, जिल्हा परिषदेच्या १८८, खासगी अनुदानीत १२२, विना अनुदानीत, अंशतः अनुदानीत ४८ शाळा आहेत. २० हजार विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. ४८ विना अनुदानीत, अंशतः अनुदानीत शाळेत जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांवर शासनाच्या दुजाभाव धोरणामुळे मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले नाही. जिल्हा परिषद व खासगी अनुदानीत शाळांतील हजाराे विद्यार्थी नवीन पुस्तके घेवून अभ्यासक्रमाकडे वळत जरी असले तरी विना अनुदानीत शाळांतील हजाराे विद्यार्थी पुस्तकाविना शाळेतून घरी परतले असून, त्यांना बाजारपेठेतूनही पुस्तके विक्री करून घेण्यास मिळत नाहीत. यामुळे शासनाच्या धोरणामुळे विद्यार्थी व पालकांची तारांबळ जरी उडाली असली तरी त्याने शालेय जीवन मात्र, अंधःकारमय दिसून येत असल्याने पालकवर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

■ ई सकाळवरील महत्वाच्या बातम्या

"भारत-सिंगापूर' मैत्रीमुळे चीन अस्वस्थ!
पवार 'समृद्धी' प्रकल्पाच्या विरोधात कसे?
#स्पर्धापरीक्षा - भारत-अमेरिका संरक्षण करार
'मुदतपूर्व'च्या फुक्‍या जोर-बैठका
पतधोरणाची पावले योग्य दिशेने
रविवारी भारत - पाकचा लंडनला डबल धमाका
भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल
कराल "नायगरा'ने गिळले विक्रमवीरास..
पुरूष नाटकामागे घडलेले नाट्य प्रथमच रंगमंचावर
लंडन : अग्नितांडवात किमान 65 मृत्युमुखी?
'SCO'त मतभेदांना स्थान नाही
ध्वनिक्षेपकावरून एकाच वेळी 'अजान'
लोकवर्गणीतून 7 कि.मी.पर्यंत नदीचे खोलीकरण व रुंदीकरण

Web Title: nanded news government policy and student