कारला येथील कुटुंबीयांना नामकडून पंधरा हजाराची मदत

naam foundation
naam foundation

उमरी (नांदेड): कारला येथे विज पडुन मुत्यूमुखी पडलेल्या कुटूंबीयातील पाच सदस्यांना नाम फाऊंडेशन वतीने प्रत्येकी पंधरा हजाराची मदत देण्यात आली.

नांदेडचे समन्वयक डॉ. अशोक बेलखोडे यांच्या प्रयत्नातुन सानुग्रह वाटप करताना जिल्हा संघटक डॉ. बालाजी कोंपलवार, उमरी तालुका समन्वयक प्रा. नवनाथ अडकिणे, दिपनाथ पत्की, नायगावचे समन्वयक भाऊराव मोरे, डॉ. अशोक सिध्देवाड, रामदास फुलारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कारला येथे 12 जुन रोजी सायकाळच्या सुमारास शेतातील कचरा वेचताना अचानक पाऊस आला होता. पावसात भिजत असल्याने त्याच शेतातील लिंबाच्या झाडाखाली आश्रय घेताना विज पडली. यामध्ये शोभाबाई जाधव, शोभाबाई भुताळे, रेखाबाई पवळे, शेषकलाबाई गंगावणे, मोहनबाई सोनवणे आदी जागीच मृत्युमखी पडले होते. जिल्हात पहिल्यांदाच अशी घटना घडली असल्याने सामाजिक कार्यकत्यासह प्रशासन हदरले होते. प्रशासन हजर होऊन मदत कार्याच्या कामाला लागले होते. यात नाम फाऊडेंशनच्या वतीने मयतांच्या कुटूंबीयाना आर्थिक मदत देण्याचे काम येथाल समन्वयक प्रा. नवनाथ आडकिणे व भाऊराव मोरे यांच्या माध्यमातुन मिळाले. व्हिपीके ग्रुपचे चेअरमन तथा उद्योजक मारोतराव कवळे यांनीही मदत दिली.

■ ई सकाळवरील महत्वाच्या बातम्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com