कल्याणमध्ये रिक्षा, टॅक्सी संघटनांकडून ओला, उबरला 'प्रवेशबंदी'

रविंद्र खरात
बुधवार, 5 जुलै 2017

कल्याण: प्रवाशांना स्वस्त आणि दर्जेदार सेवा पुरवणाऱ्या ओला, उबर, मेरू, टॅब या टॅक्सीसेवेचा धसका घेतलेल्या रिक्षा, टॅक्सी संघटनांनी कल्याणमध्ये या गाडय़ांना स्वत:हूनच 'प्रवेशबंदी' जाहीर केली आहे. 'खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडय़ांना कल्याण स्थानक परिसरात प्रतिबंध करण्यात येत आहे' असे फलक कल्याण स्थानक परिसरात लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या फलकांवर 'आदेशावरून'च्या खाली 'उपप्रादेशिक परिवहन विभाग' असे नाव लावण्यात आले आहे. त्यामुळे हे आदेश परिवहन विभागाचे असल्याचा संभ्रम होत आहे. मात्र, दुपार नंतर आरटीओ कार्यालय मार्फ़त ते बोर्ड काढण्यात आले.

कल्याण स्थानक परिसर मधून रिक्षा प्रवास करताना नेहमीच प्रवासी वर्गाला त्रास होत आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून कल्याण मधील रिक्षा चालक मीटर ने भाड़े आकारत नाही, मनमानी भाड़े आकारणार, वाटेल तेथे रिक्षा उभी करणार, स्टेशन परिसर मधून नागरिकांना रिक्षाशिवाय अन्य कोणताही पर्याय नसावा, यासाठी रिक्षा चालक आणि त्यांच्या संघटना काम करत असल्याचे समोर आले असून कल्याण एसटी डिपो समोर पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांचे अधिकृत बस थांबे असताना तेथे रिक्षानी अतिक्रमण केले असून त्यांच्या वर न आरटीओ न वाहतुक पोलिस कारवाई करत नसल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रिक्षा चालकांच्या मनमानी भाड़े घेणे, नाकारणे, मारामारी करने, महिलाच्या छेड़ काढणे, आदी प्रकार वाढल्याने नागरिकामध्ये रिक्षा चालकाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे, दरम्यान, ओला, उबेर, मेरू या टॅक्सीमधून  सुरक्षित आणि स्वस्त प्रवास मिळत असल्याने नागरिकांची मागणी मध्ये वाढ झाल्याने रिक्षा व्यवसाय वर परिणाम होत असल्याने आता रिक्षा चालक आणि संघटनाकडून विरोध वाढत असून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.  

प्रवेश बंदी नाही..
कल्याण रेल्वे स्टेशन परिसर मध्ये ओला, उबर, मेरू, टॅब टैक्सी चालक प्रवाशांच्या मागणीनुसार येऊन तेथून प्रवाशांना इच्छित स्थळी सोडू शकतात. या वाहनांना शहरात कोणत्याही ठिकाणी सेवा देण्यास कोणतेही र्निबध नाहीत. त्यामुळे त्यांना कल्याण रेल्वे स्थानक परिसरातही प्रवेश बंदी करण्यात आलेली नाही. आरटीओने प्रवेश बंदी चा बोर्ड लावला नसून ते बोर्ड काढण्याचे आदेश अधिकारी वर्गाला दिले असल्याची माहिती कल्याण आरटीओ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:ञ
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​
Web Title: kalyan news rikshaw, taxi ban to uber ola