घाटकोपर इमारत दुर्घटना चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

आतील पिलर तोडल्यामुळेच इमारत पडली. एन वॉर्डमधील कार्यकारी अभियंता व सहायक अभियंता यांच्यावरही कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.

मुंबई : घाटकोपर येथील इमारत दुर्घटना प्रकरणाची चौकशी करून संबंधित अहवाल आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचा स्थानिक कार्यकर्ता सुनिल शितप याचा बेजबाबदरापणा या दुर्घटनेला कारणीभूत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

आतील पिलर तोडल्यामुळेच इमारत पडली. एन वॉर्डमधील कार्यकारी अभियंता व सहायक अभियंता यांच्यावरही कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. तसेच, एन वॉर्डच्या स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे. अतिरिक्त पालिका आयुक्त विजय सिंघल, उपायुक्त विनोद चिठोरे व उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांच्या चौकशी समितीने हा अहवाल सादर केला आहे.

अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांना संबंधित अधिकाऱ्यांची पुन्हा चौकशी करून कारवाई करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. शितपची एन. व एस. वॉर्डात अनधिकृत बांधकामे असल्याचे अहवालात म्हटलं आहे. शितपच्या या अनधिकृत बांधकामावर कायद्यानुसार लवकर कारवाई करा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी सहा महिन्यात करा, असेही आयुक्त मेहता यांनी सांगितले आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

    Web Title: mumbai news ghatkopar building collapse inquiry report