शेतकरी निवासस्थान बनलंय गोदाम; शेतकऱ्यांसाठी खुले करण्याची मागणी

दिलीप पाटील
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

सदर इमारतीमधील कृषी साहित्य तत्काळ काढून ही इमारत शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात येईल.
- अश्विनी शेळके, सभापती, पंचायत समिती, वाडा

वाडा : तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांना थांबण्यासाठी (विसावा) वाडा येथे 1985-86 साली ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर शेतकरी निवास्थानाची इमारत बांधण्यात आली होती. मात्र सध्याच्या स्थितीत ह्या निवासस्थानाची अवस्था बिकट झाली असून त्या शेतकरी निवासस्थानाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी न होता पंचायत समितीचे कृषी साहित्य ठेवण्यासाठी गोदाम म्हणून करण्यात येत आहे.

वाडा तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक शेतकरी कामानिमित्त वाडा येथे येत असतात. त्यांच्यासाठी 1985-86 साली रत्नाकर पाटील हे सभापती असताना शेतकरी निवासस्थान बांधण्यात आले होते. मात्र आजच्या घडीला ह्या निवासस्थानाकडे प्रशासनाचे तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने ह्या इमारतीच्या दरवाजे-खिडक्यांची अवस्था बिकट झाली असून ह्या इमरतीचा उपयोग शेतकऱ्यांसाठी न करता पंचायत समितीच्या कृषी विभागातील आनुदानीत कृषीसाहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत आहे.
सदर इमारतीमधे असलेले पंचायत समितीच्या कृषी विभागाचे साहित्य काढून ह्या इमारतीची डागडुगी करून ती शेतकऱ्यांच्या निवास्थानासाठी खुली करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. वाडा येथे तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी 1985-86 साली शेतकरी निवस्थान बांधण्यात आले आहे. मात्र पंचायत समितीकडून त्याचा उपयोग गोडाऊन म्हणून केला जातो. वरील ईमारतीमधील कृषी साहित्य तत्काल बाजूला हटऊन त्या इमरतीची डागडूगी करण्यात येऊन ती तत्काल शेतकऱ्यांसाठी खुली करावी.
- कांतिकुमार ठाकरे, अध्यक्ष, मनसे वाडा तालुका

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’

Web Title: palghar news vada shetkari niwas became godown