कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग समितीवर महिला राज

रविंद्र खरात
बुधवार, 5 जुलै 2017

कल्याणः कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 10 प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत प्रत्येकी एकच महिला नगरसेविकांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यामुळे आज (बुधवार) झालेल्या प्रभाग समिती सभापती निवडणूक बिन विरोध झाली. सर्वच प्रभाग समिती सभापती पदासाठी सर्व पक्षाने महिला नगरसेविकांना उमेदवारी दिल्याने प्रभाग समितीवर महिला राज पुढील एक वर्ष राहणार आहे .

कल्याणः कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 10 प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत प्रत्येकी एकच महिला नगरसेविकांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यामुळे आज (बुधवार) झालेल्या प्रभाग समिती सभापती निवडणूक बिन विरोध झाली. सर्वच प्रभाग समिती सभापती पदासाठी सर्व पक्षाने महिला नगरसेविकांना उमेदवारी दिल्याने प्रभाग समितीवर महिला राज पुढील एक वर्ष राहणार आहे .

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग समिती पदाच्या निवडणुका गेल्या तीन महिन्यांपासून रखडल्या होत्या.  आज रोजी पालिका मुख्यालयमध्ये 10 प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून मुंबई शहर जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी काम पाहिले. प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणूकीमध्ये प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली.

एक अ प्रभागातून मनसेच्या सुनंदा कोट, दोन ब प्रभागातून सेनेच्या मनिषा तारे, तीन क प्रभागातून एमआयएमच्या शकीला खान, चार जे मधून भाजपच्या सुमन निकम, पाच डमधून भाजपच्या हेमलता पावशे, सहा फ मधून भाजपच्या खुशबू चौधरी, सात ह प्रभागातून सेनेच्या रेखा म्हात्रे, आठ ग मध्ये भाजपच्या अलका म्हात्रे, नऊ आयमध्ये बसपाच्या सोनी अहिरे, 10 ई मध्ये भाजप पुरस्कृत संघर्ष समितीच्या दमयंती वझे यांचे एक मेव अर्ज दाखल झाल्याने बिन विरोध विजयी झाल्या.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपाची युती असून प्रभाग समिती मध्ये दोन्ही पक्षाचे वर्चस्व असताना शिवसेनेने प्रभाग समिती पद मनसे आणि एमआयएमला दिल्याने आगामी वर्ष भरात महापौर पदाच्या निवडणूक साठी भाजपावर दबाव टाकत आपलाच महापौर पुन्हा येणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती.

पत्रकार नाराज ...
आजपर्यंत प्रत्येक निवडणूक वृतांकन करण्यासाठी पत्रकारांना सभागृह मधील प्रेक्षक गैलरीमध्ये प्रवेश दिला जात असे. मात्र, आज झालेल्या प्रभाग समिती सभापती निवडणूकीमध्ये पत्रकाराना बंदी घातल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:ञ
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​
Web Title: thane news kalyan dombivli municipal corporation election