कर्जमाफीच्या अर्जाबद्दल बँकच अनभिज्ञ, शिवसैनिकांनी बँकेला ठोकले टाळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

कोल्हापूर : शासनाकडून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीचे भरण्यात येणाऱ्या आॅनलाईन, आॅफलाईन अर्ज नोंदींची माहिती बँक आॅफ इंडियाच्या महाद्वार रस्त्यावरील शाखेत विचारावयास गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बँक व्यवस्थापकांनी माहिती उपलब्धच नसल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बाहेर काढून बँकेला टाळे ठोकले. आज (बुधवार) दुपारी सव्वा एक वाजता घडलेल्या या प्रकारामुळे बँकेबाहेर चांगलाच गोंधळ निर्माण झाला. 

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे कर्जमाफी जाहीर केेली आहे. त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला आॅनलाईन व नंतर मागणीनुसार आॅफलाईन अर्ज भरण्यात येत आहेत. हे अर्ज भरण्यासाठी काही जणांनी चक्क दलाली करीत भरमसाठ पैसे घेत असून शेतकऱ्यांना पुन्हा भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

जिल्हयातील शेतकऱ्यांनी भरलेल्या अर्जांची माहिती घेण्यासाठी शिवसेनेने आज महाद्वार रोडवरील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत बँकेत धडक दिली. तेथील व्यवस्थापकांना याबाबत विचारणा करता त्यांनी माहितीच उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने शिवसैनिक संतापले. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी व्यवस्थापकांना योग्य माहिती देता येत नसेल तर बँकेत कशाला राहता, असा सवाल करत व्यवस्थापक यांना बाहेर काढून बँकेला टाळे ठोकले. यामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. या वेळी मुरलीधर जाधव, रवि चौगले, सुजित चव्हाण, चंदू भोसले, सुजीत राणे आंदीसंह शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: kolhapur news loan waiver online application fiasco