पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव 

निवास चौगुले
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

दृष्टिक्षेपात देवस्थान समिती 
कार्यक्षेत्र - कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग 
एकूण देवस्थाने - 3066 
देवस्थानची जमीन - 10, 492 हेक्‍टर 
संचालक मंडळाचे स्वरूप - एक अध्यक्ष, एक खजिनदार व पाच सदस्य 
सचिव - महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी

कोल्हापूर : गेली काही वर्षे रेंगाळलेल्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांची तर खजानिसपदी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर यांची नियुक्ती झाली. 

कोल्हापूरसह सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या देवस्थान समितीचे अध्यक्षपद 2010 पासून रिक्त होते. त्याशिवाय समितीचे खजीनीसपदही रिक्त होते. तोपर्यंत या पदावर ऍड. गुलाबराव घोरपडे कार्यरत होते. मात्र, गेल्या सात वर्षापासून या पदावर नियुक्तीच झालेली नव्हती. दरम्यानच्या काळात तत्कालीन जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, राजाराम माने, अमित सैनी आणि त्यानंतर विद्यमान जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यावर अध्यक्षदाची जबाबदारी होती.

राज्यात भाजप आघाडीचे सरकार आल्यानंतर अनेकांची नांवे या पदासाठी चर्चेत होती, प्रत्यक्षात कोणाचीही वर्णी लागलेली नव्हती. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर "शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भारतीय जनता पक्षात केल्यानंतर त्यांना एप्रिलमध्ये पुणे- म्हाडाचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर पुन्हा देवस्थान समिती अध्यक्ष आणि खजानीस पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. काल या दोन्ही निवडींची घोषणा झाली. विद्यमान संचालकांची मुदत संपल्यानंतर तेथे नवीन संचालकांच्या निवडी होतील. 

दृष्टिक्षेपात देवस्थान समिती 
कार्यक्षेत्र - कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग 
एकूण देवस्थाने - 3066 
देवस्थानची जमीन - 10, 492 हेक्‍टर 
संचालक मंडळाचे स्वरूप - एक अध्यक्ष, एक खजिनदार व पाच सदस्य 
सचिव - महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी

 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Kolhapur news temple trust committee in kolhapur