कोपर्डी: अपीलासाठी अजून पाच दिवसांची मुदत

सूर्यकांत नेटके
सोमवार, 24 जुलै 2017

सुनावणी लांबविण्यासाठीचे प्रयत्न : ऍड. निकम
ऍड. उज्जल निकम म्हणाले, "खटल्यातील साक्षी व अन्य बाबी पुर्ण झालेल्या
आहेत. उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी आरोपीच्या वकीलाला चौदा दिवसाची
मुदत दिली. मात्र त्यांनी अपील दाखलच केले नाही. आता पुन्हा मुदत वाढवून
मागत आहेत. मुळात खटला लांबण्यासाठी मुद्दामहून प्रयत्न केले जात आहेत
असा आरोप ऍड. निकम यांनी केला.''

नगर : कोपर्डी बलात्कार व खून खटल्यात विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल
निकम यांच्यासह सहा जणांच्या साक्षीसाठी ऍड. बाळासाहेब खोपडे यांना मुंबई
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील करण्यासाठी न्यायालयाने अजून
पाच दिवसाची मुदत दिली. खंडपीठात दाखल करणार असलेल्या अपिलाच्या स्थितीबाबत 29 जुलै रोजी म्हणणे मांडण्यास न्यायालयाने बजावले आहे.

कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून खटल्याची सुनावणी विशेष
जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर नगरच्या जिल्हा सत्र
न्यायालयात सुरू आहे. खटल्याचे कामकाज अंतीम टप्प्यात आलेले आहे.
आरोपी संतोष भवाळचे वकील ऍड. बाळासाहेब खोपडे यांनी, "यशदा'चे माजी
अधिकारी रवींद्र चव्हाण, विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम, डॉ.
राजाभाऊ थोरात, पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, नाशिकच्या न्यायवैद्यक
प्रयोगशाळेचे संचालक आणि नगरचे जिल्हाधिकारी यांची साक्ष नोंदविण्याबाबत
दिलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर ऍड. खोपडे यांनी ""जिल्हा
न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठात अपील करणार आहोत,' असे सांगितले होते. त्यावर न्यायालयाने
आजपर्यत (24 जुलै) अपिलाच्या स्थितीबाबत म्हणणे मांडण्यास बजावले होते.

आज (सोमवारी) सकाळी आकरा वाजता ऍड. खोपडे यांनी "दिड वाजेपर्यत सांगतो'
असे न्यायालयापुढे स्पष्ट केले. दिड वाजता कामकाज सुरु झाले. त्यानंतर
ऍड. खोपडे यांनी उच्च न्यायालयात अपालाची प्रक्रिया पुर्ण झालेली नाही.
त्यामुळे मुदत वाढवून मागितली. त्यावर विशेष सरकारी वकील ऍड. उज्जल निकम
यांनी आक्षेप घेतला. न्यायालयाने पाच दिवसाची मुदत वाढवून दिली आहे. आता
29 जुलै रोजी आपीलाबाबत म्हणणे मांडावे. त्यानंतर खटल्याच्या अंतीम
युक्तीवादाची तारीख निश्‍चित केली जाईल असे सांगितले.

सुनावणी लांबविण्यासाठीचे प्रयत्न : ऍड. निकम
ऍड. उज्जल निकम म्हणाले, "खटल्यातील साक्षी व अन्य बाबी पुर्ण झालेल्या
आहेत. उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी आरोपीच्या वकीलाला चौदा दिवसाची
मुदत दिली. मात्र त्यांनी अपील दाखलच केले नाही. आता पुन्हा मुदत वाढवून
मागत आहेत. मुळात खटला लांबण्यासाठी मुद्दामहून प्रयत्न केले जात आहेत
असा आरोप ऍड. निकम यांनी केला.''

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: Nagar news Kopardi rape case hearing