महाराष्ट्रातील 19 टपाल कार्यालयांत पासपोर्ट सुविधा केंद्र: व्ही. के. सिंग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

सोलापुरात पासपोर्ट लघु सेवा केंद्राचे उद्‌घाटन

सोलापूर: परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने देशभरातील 226 मुख्य टपाल कार्यालयात पासपोर्ट सुविधा केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 19 टपाल कार्यालयात ही सुविधा उपलब्ध केली जाईल, अशी घोषणा परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी केली.

सोलापुरात पासपोर्ट लघु सेवा केंद्राचे उद्‌घाटन

सोलापूर: परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने देशभरातील 226 मुख्य टपाल कार्यालयात पासपोर्ट सुविधा केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 19 टपाल कार्यालयात ही सुविधा उपलब्ध केली जाईल, अशी घोषणा परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी केली.

सोलापुरातील पासपोर्ट लघु सेवा केंद्राचे उद्‌घाटन श्री. सिंग यांनी व्हीडीओ कान्फरन्सिंगद्वारे दिल्ली येथून केले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री विजय देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार ऍड. शरद बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशीकला बत्तुल, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे व पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे उपस्थित होते.

श्री.सिंग म्हणाले,"" महाराष्ट्रात आठवे पासपोर्ट केंद्र सुरु करीत आहोत. हे केंद्र सुरु करण्यासाठी खूप वेळ लागला. मात्र सुरु करण्यासाठी ज्यांनी मदत केली, त्या सर्वांचा आभारी आहे. भारत सरकार पासपोर्ट देण्याची सुविधा अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील मुख्य टपाल कार्यालयात ही सुविधा केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 86 ठिकाणी हे केंद्र सुरु होईल, त्यापैकी महाराष्ट्रातील 19 टपाल कार्यालयांचा समावेश आहे. कोणत्याही नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी 50 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. सोलापूरच्या केंद्रातून रोज 100 पासपोर्ट दिले जाणार आहेत. गरज भासेल त्यावेळी त्यात वेळोवेळी वाढ करण्यात येईल. या केंद्रामुळे सोलापूरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील नागरिकांची सोय होणार आहे.''

यावेळी पालकमंत्री श्री. देशमुख, खासदार श्री. मोहिते-पाटील, खासदार ऍड. बनसोडे व आमदार शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. सचिव श्री. मुळे यांनी पासपोर्ट संदर्भात शासन घेत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी कार्यालयातील व्यवस्थांची माहिती दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: solapur news passport office and v k singh