Solapur : मैदानात उतरण्याची हीच वेळ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur : मैदानात उतरण्याची हीच वेळ...

Solapur : मैदानात उतरण्याची हीच वेळ...

सोलापूर : मागील दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. त्यासोबत आता सुयोग्य शारीरिक क्षमता संवर्धन व नैसर्गिक प्रतिकारक्षमता विकासासाठी मैदानावर उतरण्याची वेळ आली आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला व्यायाम, खेळ व योगासाठी हिवाळा निमंत्रित करू लागला आहे. कोरोनानंतर आरोग्य व नैसर्गिक प्रतिकारक्षमता या दोन घटकांबद्दल जागरूकता वाढली आहे. हिवाळ्यात शरीराला पुरेसा व्यायाम देण्याची गरज असते.

हेही वाचा: Solapur : ऊस दरासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

फक्त पाच टक्के मुले मैदानावर

विशेषतः एकूण संख्येच्या तुलनेत केवळ पाच टक्के शालेय विद्यार्थी मैदानावर येत आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनी कोरोनात मोबाईल व टीव्हीची सवय लावून घेतल्यामुळे त्यांची मैदानावरील उपस्थिती नगण्य आहे. या प्रकारामुळे या मुलांमध्ये लठ्ठपणा, सतत आजारी पडणे, अपचन यांसारख्या अनेक व्याधी वाढू लागल्या आहेत. ज्या वयात शारीरिक क्षमता बळकट करायच्या आहेत, त्या वयात ही मुले लठ्ठपणाच्या समस्येला बळी पडू लागली आहेत.

हेही वाचा: Solapur : भिमा च्या काटयात तफावत आढळली तर मोठे बक्षीस देऊ; विश्वजीत महाडिक

मैदानावर काय करावे?

- २ ते ५ वर्षे वयोगट : या मुलांना मैदानावर पालकांनी रोज सकाळी व सायंकाळी न्यावे. त्यांना मैदानावर उडी मारणे, बॉल पकडणे, बॉल आणणे, पळणे असे काही प्रकार करायला शिकविले पाहिजे. त्यामुळे त्यांची भूक वाढते व शारीरिक क्षमतांचा विकास होतो.

- इयत्ता पहिली ते सातवी : मैदानावर वॉर्मअप करणे. लांब उडी, फक्त पाच सेकंद वेगाने पळून थांबणे, उड्या मारणे व आवडत्या खेळाचा तासभर सराव करणे.

- सातवी ते महाविद्यालयीन स्तर : या वयोगटात बॅडमिंटन, जलतरण, धावणे, सायकलिंग, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल यांसारख्या परिपूर्ण व्यायाम घडवणाऱ्या एका खेळात प्रावीण्य मिळवत नियमित सराव करणे. याशिवाय सरावाआधी वॉर्मअप, सूर्यनमस्कार व नंतर कूलडाउन करणे.

- प्रौढ वयोगट : नियमित वॉकिंग, वॉर्मअपचे सर्व व्यायाम, सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम

हेही वाचा: Solapur : तीर्थक्षेत्र पंढरपूर बनले समस्यांचे माहेरघर

सर्व वयोगटातील व्यक्तींनी हिवाळ्यात मैदानावर हजेरी लावली पाहिजे. किमान एक ते अनेक तास मैदानावर वॉर्मअप, मैदानी खेळांचा सराव, योगा या सर्व गोष्टींसाठी वेळ द्यायला हवा. स्वतःच्या शारीरिक क्षमतांचा विकास हा देखभाल या माध्यमातून होतो. तसेच नैसर्गिक प्रतिकारक्षमता देखील भक्कम बनते.

- सूर्याजी लिंगडे, सहायक उपनिरीक्षक तथा एनआयएस कोच, एसआरपी कॅम्प, सोलापूर

हेही वाचा: Solapur : वारीइतक्याच गर्दीवर DYSP पोलीस निरीक्षकाचा बंदोबस्त यशस्वी

हेमंत व शिशिर ऋतूमध्ये शरीरातील पाचक अग्नी वाढलेला असतो. त्यामुळे पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. सकाळी न्याहारीमध्ये पौष्टिक पदार्थांचे सेवन करून वर दूध प्यावे. तसेच सकाळी फिरणे, सूर्यनमस्कार, प्राणायाम, दंडबैठका आदी व्यायाम करावेत. नियमितपणे तीळ तेलाने शरीराला मालिश करून उन्हात काही वेळ बसावे. हिवाळ्यात गहू, उडीद, दूध, दुधाच्या पदार्थांचे व तीळ तेलाचे सेवन हितकर असते. थंडीपासून रक्षण करण्यासाठी तूप, तेल, अंडी, मासेयुक्त पदार्थांचे सेवन करावे. हिवाळ्यात कोमट किंवा अधिक गरम पाण्याने स्नान करावे.

- डॉ. सुरेश खमितकर, आयुर्वेदाचार्य, सोलापूर

हेही वाचा: Solapur : एक पणती वंचितांच्या दारी!

परंपरा आहाराची

सर्वसाधारणपणे भारतीय आयुर्वेदानुसार डिंकाचे लाडू, च्यवनप्राश या दोन पदार्थांना मोठे महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार आवळा हा आयुष्यवर्धक आहे. आवळ्यापासून केले जाणारे च्यवनप्राश खूप प्रभावी मानले जाते. तसेच हिवाळ्यात डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, उडीद लाडू, सुकामेव्याचे पदार्थ खाण्याची परंपरा आहे. तिळाच्या तेलाने मालिशीलाही महत्त्व आहे. वर्षभर आवश्यक असलेल्या निरोगीपणासाठी व्यायामासोबत डिंकाचे, मेथीचे व उडदाचे लाडू यांचे महत्त्व आहे.

हेही वाचा: Solapur : मोहोळच्या प्रथम नगराध्यक्षांनी कामगारांना वाटली एक टन साखर

या दिवसांत पचन क्षमता चांगली असल्याने मांसाहारींसाठी चिकन सूप, अंडी हे प्रथिनाचे मोठे स्रोत उपयुक्त ठरतात. शाकाहारींसाठी फळाचे सूप, डिंक लाडू, प्रथिनयुक्त सुकामेवा हे उपयुक्त आहेत. व्यायामाच्या बरोबरीने उत्तम आहार या कालावधीत आवश्यक आहे.

- अलमास चट्टरकी, आहारतज्ज्ञ, सोलापूर