
Alka Kubal on Bajirao Mastani: आपल्या अभिनयाने कित्येक वर्ष मराठी सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. गेली कित्येक वर्ष त्यांनी मराठी सिनेसृष्टीवर राज्य केलं. 'माहेरची साडी' या चित्रपटाने त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी मागे पाहिलं नाही. मात्र याच चित्रपटामुळे त्यांना एक रडूबाईची इमेजदेखील मिळाली. त्यामुळे त्यांना पुढे तसेच चित्रपट मिळाली. अशाच एका कारणामुळे त्यांच्या हातून चक्क संजय लीला भन्साळी यांचा 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट निसटला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं आहे.