

Pune NCP BJP MLC devendra fadanvis and sinetra pawar
esakal
NCP BJP seat dispute : पुणे विधानपरिषदेच्या रिक्त जागेवरून महायुतीतच रस्सीखेच सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. ही जागा भाजपकडेच राहावी, यासाठी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात अंतर्गत संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.
पुणे महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पक्षाकडे सुमारे ३३३ मतदारांचे भक्कम संख्याबळ असल्याचा दावा करत ही जागा भाजपलाच देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.