पुणे जिल्हा परिषदेला 'कोणी शिक्षक देता का शिक्षक?'

रमेश वत्रे
बुधवार, 5 जुलै 2017

दौंड तालुक्‍यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा पालकांचा कल वाढत असला तरी प्रशासनाचे दर्जेदार शिक्षण देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. तालुक्‍यात 122 शिक्षकांच्या जागा रिक्त असून 26 शाळांना मुख्याध्यापकच नाहीत.

केडगाव (जि. पुणे) : दौंड तालुक्‍यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा पालकांचा कल वाढत असला तरी प्रशासनाचे दर्जेदार शिक्षण देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. तालुक्‍यात 122 शिक्षकांच्या जागा रिक्त असून 26 शाळांना मुख्याध्यापकच नाहीत. गेली पाच ते सात वर्षापासून मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील 22 हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात रिक्त जागांचा प्रश्न भेडसावत आहे.

यंदाच्या वर्षी 15 जूनला वाजत गाजत विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये स्वागत करण्यात आले. पण शिक्षण देणारे पुरेसे शिक्षकच नसतील तर शैक्षणिक गुणवत्तेची अपेक्षा धऱणार तरी कशी. तालुक्‍यात शिक्षकांची 1034 पदे मंजूर असून पैकी 912 शिक्षक कार्यरत आहेत. 122 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. 26 प्राथमिक शाळांना मुख्याध्यापकच नाहीत. एका शिक्षकाला दोन तीन वर्ग सांभाळावे लागत आहेत. शिक्षण विस्तार अधिका-यांची चार पदे मंजूर आहेत मात्र एकाच विस्तार अधिका-यावर सर्व डोलारा उभा आहे. केंद्र प्रमुखांच्या पाच जागा रिक्त आहेत. उपशिक्षकांकडे केंद्र प्रमुखांचा पदभार दिलेला आहे. गटविकास अधिका-यांची बदली होऊन महिना झाला तर गटशिक्षण अधिकारी नुकतेच निवृत्त झाले आहेत. विस्तार अधिका-याकडे गटशिक्षण अधिकाऱ्याचा पदभार दिला आहे.

शाळेतील उपशिक्षकांकडे मुख्याध्यापकांचे पदभार दिलेले आहेत. या शिक्षकांनी अशैक्षणिक कामे करायची, शिकवायचे अन व्यवस्थापनही पाहायचे अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिक्षण हक्क कायद्याची येथे पायमल्ली होताना दिसत आहे. मुख्याध्यापकांचे काम पाहिले म्हणून पगारात काही फरक पडत नाही. जिल्हा परिषदेने बिंदू नामावलीच्या खाली सात वर्ष काढली आहेत. आता बिंदू नामावलीचे काम पुर्ण झाले आहे. मात्र शिक्षक कधी येणार याकडे पालकांचे डोळे लागले आहेत. पंचायत समितीच्या सभापती मीना धायगुडे म्हणाल्या, जिल्हा परिषदकडे शिक्षक मागणीचा पाठपुरावा करण्यात येत असून शिक्षक मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदकडे दिला आहे.

भरतीशिवाय प्रश्न सुटू शकत नाही. शिक्षण खात्यात 2010 ला भरती झाली. त्यानंतर भरती झालेली नाही. राज्यात दरवर्षी 10 हजार शिक्षक निवृत्त होतात. राज्यात 50 लाख शिक्षणसेवक आहेत. ते देईल त्या पगारावर काम करायला तयार आहेत. गलांडवाडी प्राथमिक शाळेला गेल्या सात वर्षापासून मुख्याध्यापक तर गेल्या चार वर्षापासून पदवीधर शिक्षक नाही. या शाळेने दोन खासगी पदवीधऱ शिक्षक नेमले असून त्यांचे पगार ग्रामस्थ करीत आहेत. दौंड तालुक्‍यातील सर्वात मोठी प्राथमिक शाळा धायगुडेवाडी ( चौफुला ) येथे आहे. या शाळेला गेल्या पाच वर्षापासून पात्र मुख्याध्यापक नाहीत.

■ ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​
Web Title: pune district kedgaon pune news zp news marathi news